Friday, 6 February 2015

दक्षिण भारताकडे जाणार्‍या आगगाड्यांमध्ये ई-खानपान सुविधा



लांब पल्ल्यांच्या आगगाड्यांनी प्रवास करताना खानपान हा नेहमीच एक प्रश्न असतो. पूर्वीच्या काळी लोक आपापले जेवण्खाण, पाणी घेऊनच प्रवासाला निघत असत. नंतर रेल्वेमधे खानपान सेवा सुरू खाल्या. राजधानी सारख्या काही गाड्या सोडल्या तर इतर गाड्यांत ही खानपान सेवा वाटेवरच्या स्टेशन्सवरूनच दिली जाते. बहुतेक स्टेशन्सवर या सेवेचे ठेके दिलेले असतात व ठेकेदार जे जेवण देईल ते खाण्याशिवाय प्रवाशांना गत्यंतर नसते.

साधारण जेवणखाण्यच्या वेळेच्या आधी तास दोन तास, रेल्वेचा कोणी कर्मचारी डब्यातून फिरताना व ऑर्डर बूक करताना नेहमीच बघायला मिळतो. हा कर्मचारी आपल्या कम्पार्ट्मेंटमधे येतो त्या वेळेस जर आपण ऑर्डर दिली नाही तर नंतर काहीच मिळत नाही असा नेहमीचाच अनुभव आहे.

यावर उपाय म्हणून दक्षिण भारताकडे जाणार्‍या गाड्यांमध्ये, फोन किंवा एसएमएस करून आपल्याला हवे ते जेवणखाण ऑर्डर करण्याची सुविधा आता सुरू करण्यात आली आहे. सध्या 38 गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्द्ध झाली आहे. रेल्वेने स्टेशन्सवर फूड प्लाझा आणि फासत फूड काउंटर्स या स्टेशन्सवर उघडले आहेत व तेथून ही सेवा देण्यात येणार आहे.

रेल्वेने नियमित प्रवास करणार्‍यांची प्रवासात चांगले जेवण उपलब्द्ध होत नाही अशी नेहमीच तक्रार असते. त्यांना ही नवी सेवा खचितच पसंत पडेल.

 6 फेब्रुवारी 2015