Monday, 9 February 2015

भारतीय नौदलासाठी खास बनवलेल्या किरण लढाऊ विमानाचे यशस्वी उड्डाण



LCA-NP2 असे सांकेतिक नाव असलेल्या आणि खास नौदलासाठी उत्पादन केलेल्या, भारतीय बनावटीच्या, किरण या हलक्या लढाऊ विमानाने आपले पहिले उड्डाण 6 फेब्रुवारी 2015 रोजी बेंगळुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या धावपट्टीवरून यशस्वी रितीने पार पाडले.

हे विमान साधारणपणे 35 मिनिटे हवेत होते. विमानवाहू नौकेवर उअतरवता यावे यासाठी या विमानाची चाके असलेली उतरण्याची यंत्रणा, एअरक्राफ्ट रिसर्च अ‍ॅन्ड डिझाइन सेंटर या संस्थेने विशेष विकसित केलेली आहे.
या विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे  भविष्यकालात भारतीय नौदलाला भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांची उपलब्धता असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
9 फेब्रुवारी 2015