माझ्या परिचित असलेल्या एका गृहस्थांना दोन दिवसापूर्वी कार्डियाक अस्थमाचा त्रास होऊ लागल्याने इस्पितळात दाखल व्हावे लागले. आता यांना गृहस्थ कसे म्हणायचे हा सुद्धा एक प्रश्नच आहे कारण त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच निवर्तली आहे. परंतु दुसरा समर्पक शब्द न सुचल्याने मी त्यांना गृहस्थ म्हणतो आहे. हे गृहस्थ पुण्यात एकटेच रहातात. वय आहे साठीच्या जवळपास! दोन मुलगे आहेत. त्यांची लग्ने झालेली आहेत. नातवंडे आहेत. आर्थिक दृष्ट्याही सर्व काही ठीक ठाक आहे. या दोन मुलांपैकी एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला आहे तर दुसरा भारतातच पण जरा दूरच्या एका शहरात राहतो आहे.
इस्पितळात दाखल करायचे म्हटल्यावर मित्र परिचित यांनी त्यांना दाखल केले. भारतातल्या मुलाला फोन सुद्धा केला. कितीही लवकर यायचे ठरवले तरी एखाददुसरा दिवस हा यायला लागतोच. हे दोन दिवस या गृहस्थांच्या मित्र परिवाराने त्यांची छान काळजी घेतली आहे. भारतात रहात असलेला मुलगा, सून आता येऊन दाखल झाले आहेत. मित्र परिवाराने आतापर्यंत तरी या गृहस्थांची काळजी घेतली असली तरी त्या मित्रांनाही स्वत:ची घरे व संसार हे आहेतच. मुलगा साहजिकच आपल्या वडिलांना आपल्या बरोबर आपल्या नोकरीच्या गावी त्यांनी यावे म्हणून आता आग्रह करतो आहे. माझ्या परिचित गृहस्थांना आता खरा यक्ष प्रश्न पडला आहे की काय करायचे?
तसे बघायला गेले तर या गृहस्थांना पत्नी निवर्तल्यावर एकटे रहाण्याची बर्यापैकी सवय झाली आहे. त्यांचे रोजचे जीवन ते एकट्याने तरीही सहजतेने जगू शकत आहेत. दिवसभराचे शेड्यूल, कोणत्या मित्रांच्या बरोबर कोठे भेटायचे? काय करायचे हे सगळे ठरलेले असते. आता या वयाच्या माणसाला रोजच्या आयुष्यातला नियमितपणा हा बहुदा एक आवश्यक घटक असतो. ठराविक वेळेला सकाळी उठणे, फिरायला जाणे. जेवणांच्या ठराविक वेळा पाळणे हे सगळे व्यवस्थित पाळले जाते.
वर्षभरापूर्वी हे गृहस्थ मुलाकडे अमेरिकेला 6 महिने रहायला म्हणून गेले. कसे तरी दोन तीन महिने काढून अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत परत आले. मुलाकडे जरी सुबत्ता असली तरी त्याच्याकडे परदेशात जाऊन रहाणार्या आई-वडीलांना जे एक केविलवाणे अवलंबित्व जाणवत रहाते. समवयस्क मित्र मैत्रिणी नसल्याने जो एकटेपणा जाणवत राहतो तो सहन न झाल्याने ते शेवटी परत आले. या अनुभवामुळे अमेरिकेला परत जायचे नाही हे आता त्यांनी नक्की ठरवून टाकले आहे.
भारतातल्या दुसर्या मुलाकडे गेले तरी अडचणी या आहेतच. जागा लहानच आहे. ती मंडळी तरूण असल्याने, आहारात, विहारात नियमितपणाचा पूर्ण अभाव आहे. एक दिवस सकाळी लवकर उठतील तर दुसर्या दिवशी शनिवार आहे म्हणून सकाळी 9 वाजले तरी घरात सामसूम असेल. जेवण सुद्धा सूनबाईंच्या लहरीवर असते. कधी भेळ तर कधी इडली सांबार. जेवणाच्या वेळा ही ठरलेल्या नाहीत. एखाद दिवशी सकाळी 11 वाजता न्याहरी व जेवण हे एकत्रित केलेला ब्रन्च तर दुसर्या दिवशी जेवण दुपारी अडीच वाजता! अर्थात या सगळ्यात काही त्या कुटुंबाचे चुकते आहे असे म्हणता येणार नाही. त्यांचे वय तरूण असल्याने हा अनियमितपणा त्यांना रुचतो व चालतो. माझ्या परिचितांचे मात्र त्या घरात हाल होतात. त्यांना हवी असलेली पोळी भाजी, वरण भात काही त्यांना मिळत नाही व त्यामुळे तब्येतीच्या सारख्या कुरबुरी चालू राहतात. या कारणामुळेच ते एकटे पुण्याला आपल्या घरी राहणे पसंत करतात.
पण आता मात्र खरोखरच प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या मते त्यांना कार्डियाक अस्थमाचा त्रास सुरू झाला असल्याने त्यांनी एकटे राहणे योग्य ठरणार नाही. कारण कधी काय होईल हे सांगता येणार नाही. बिचार्यांची मानसिक परिस्थिती अगदी दोलायमान व डळमळीत झाली आहे.
मला वाटते की सध्या साठीला आलेल्या पिढीचा हा अगदी कॉमन प्रॉब्लेम होतो आहे. नवीन पिढी आता अतिशय स्वतंत्र विचाराची व कृतीची असल्याने त्यांना आपले आयुष्य स्वत:च्या कल्पनेप्रमाणे घालवावे असे वाटते व ते योग्यच आहे. मुलांना भार न होऊ देता आपण आपले उर्वरित आयुष्य जगावे असे साहजिकच या पिढीला वाटते आहे. परदेशात अनेक ज्येष्ठ किंवा वृद्ध आपले आयुष्य स्वतंत्रपणे व एकट्याने जगत असतात. पण त्यांच्याकडे असलेल्या सुविधा, वैद्यकीय मदत ही इतक्या उच्च प्रतिची असते की असे जगणे सहज शक्य होते. भारतात ज्येष्ठांना सुविधा फक्त कागदोपत्रीच मिळतात. प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच आहे.
माझे परिचित काय ठरवतील ते कळेलच. माझा कयास आहे की ते पुण्यातच आणि सध्यासारखे एकटेच बहुदा राहतील.
29 सप्टेंबर 2011