देशातल्या सर्व महानगरपालिकांचे एक महत्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे मालमता कर किंवा प्रॉपर्टी टॅक्स हे असते. परंतु या कराचे निर्धारण व वसूली करणारी, महानगरपालिकांची
यंत्रणा एवढी ढिसाळ व भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे की खरे तर जेवढा कर जमा
होणे अपेक्षित आहे त्याच्या काही टक्केच कर प्रत्यक्षात महानगरपालिकांच्या
तिजोर्यांत जमा होत असतो. पुणे महानगरपालिकेचे उदाहरण घेतले तर निर्धारण केलेली पण तिजोरीत जमा न झालेली मालमत्ता कराची रक्कम, 423 कोटी रुपये आहे. महानगरपालिकेच्या 3000 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकात, 530 कोटी रुपये उत्पन्न, मालमत्ता कराच्या द्वारे वर्षभरात येणे अपेक्षित असते. मागच्या
काही वर्षांत मिळून साठत गेलेली या कराच्या एकूण थकबाकीची ही रक्कम या
करापासून मिळणार्या वार्षिक उत्पन्नाच्या मानाने केवढी मोठी आहे हे वरील
आकड्यांवरून लगेच लक्षात येते. असे असूनही महानगरपालिका अनेक कारणांमुळे ही थकबाकी जमा करू शकत नाही.
बंगळुरू महानगरपालिका ही अशीच एक मोठी नगरपालिका आहे. या महानगरपालिकेला शहरातील नागरिकांकडून निर्धारण केलेल्या मालमत्ता कराच्या उत्पन्नापैकी, 400 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करता आलेली नाही. नियमित स्वरूपात थकबाकी वसूलीच्या नोटीसा पाठवणे वगैरे उपायांनी ही थकबाकी कमी न होता उलटी वाढत चालली आहे. महानगरपालिकेचे कमिशनर श्री. सिद्धय्या यांच्या मताने नागरिकांना दिल्या जाणार्या सुविधांवर या थकबाकीचा परिणाम आता बर्याच प्रमाणात जाणवू लागला आहे .
(Photo- BBC Corp.)
हा कर वसूल करण्यासाठी बंगळुरू महानगरपालिकेने आता एक अभिनव परंतु ध्वनी प्रदुषण निर्माण करणारा असा उपाय शोधून काढला आहे. ढोल वाजवणार्यांचे एक पथक आता महानगरपालिकेने नियुक्त केले आहे. कर न भरणार्या व्यक्ती व कंपन्या किंवा यांचे घर किंवा ऑफिससमोर जाऊन हे पथक ढोल वाजवत बसते. या
मागची कल्पना अशी आहे की हा ढोल वाजवल्याने त्या परिसरातील सर्वांना ती
व्यक्ती किंवा कंपनी यांनी वर्षानुवर्षे कर चुकवेगिरी केली आहे याची जाणीव
करून दिली जाते. महानगरपालिकेचा एक अधिकारी म्हणतो ” जेवढा आवाज जास्त मोठ्याने येतो, तेवढे कर चुकव्यांना जास्त शरमिंदे होते “
एका बहुराष्ट्रीय कंपनीने भाड्याने जागा घेतलेल्या अशाच एका इमारतीसमोर नुकताच ढोल वाजवला गेला. यामुळे त्या इमारतीचा मालक , भाडेकरू व आजूबाजूला राहणारे लोक हे सर्वच अतिशय शरमिंदे झाले. महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात की या इमारतीचा थकलेला कर लाखोवधी रुपयांचा आहे व या इमारतीचा मालक अनेक वर्षे महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटिशींची दखल सुद्धा घेत नसल्याने हा असंस्कृत असला तरी अतिशय परिणामकारक ठरणारा उपाय महानगरपालिकेने योजला आहे. हा ढोल अशा रितीने वाजवला जातो की आजूबाजूला राहणार्या सर्वांना तो वाजतो आहे हे समजावे. हा ढोल वाजत असताना तेथून जाणार्या येणार्या लोकांना हा उपाय परिणामकारक आहे असेच वाटते. मात्र ढोल वाजवण्याच्या या उपायाला सुद्धा जे करचुकवे दाद देणार नाहीत त्यांची मालमत्ता सील करणे एवढाच उपाय शेवटी महानगरपालिकेकडे उरणार आहे.
पुणे महानगरपालिकेने हा उपाय करून बघायला हरकत नाही.
30 सप्टेंबर 2011
बंगळुरू महानगरपालिका ही अशीच एक मोठी नगरपालिका आहे. या महानगरपालिकेला शहरातील नागरिकांकडून निर्धारण केलेल्या मालमत्ता कराच्या उत्पन्नापैकी, 400 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करता आलेली नाही. नियमित स्वरूपात थकबाकी वसूलीच्या नोटीसा पाठवणे वगैरे उपायांनी ही थकबाकी कमी न होता उलटी वाढत चालली आहे. महानगरपालिकेचे कमिशनर श्री. सिद्धय्या यांच्या मताने नागरिकांना दिल्या जाणार्या सुविधांवर या थकबाकीचा परिणाम आता बर्याच प्रमाणात जाणवू लागला आहे .
(Photo- BBC Corp.)
हा कर वसूल करण्यासाठी बंगळुरू महानगरपालिकेने आता एक अभिनव परंतु ध्वनी प्रदुषण निर्माण करणारा असा उपाय शोधून काढला आहे. ढोल वाजवणार्यांचे एक पथक आता महानगरपालिकेने नियुक्त केले आहे. कर न भरणार्या व्यक्ती व कंपन्या किंवा यांचे घर किंवा ऑफिससमोर जाऊन हे पथक ढोल वाजवत बसते. या
मागची कल्पना अशी आहे की हा ढोल वाजवल्याने त्या परिसरातील सर्वांना ती
व्यक्ती किंवा कंपनी यांनी वर्षानुवर्षे कर चुकवेगिरी केली आहे याची जाणीव
करून दिली जाते. महानगरपालिकेचा एक अधिकारी म्हणतो ” जेवढा आवाज जास्त मोठ्याने येतो, तेवढे कर चुकव्यांना जास्त शरमिंदे होते “एका बहुराष्ट्रीय कंपनीने भाड्याने जागा घेतलेल्या अशाच एका इमारतीसमोर नुकताच ढोल वाजवला गेला. यामुळे त्या इमारतीचा मालक , भाडेकरू व आजूबाजूला राहणारे लोक हे सर्वच अतिशय शरमिंदे झाले. महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात की या इमारतीचा थकलेला कर लाखोवधी रुपयांचा आहे व या इमारतीचा मालक अनेक वर्षे महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटिशींची दखल सुद्धा घेत नसल्याने हा असंस्कृत असला तरी अतिशय परिणामकारक ठरणारा उपाय महानगरपालिकेने योजला आहे. हा ढोल अशा रितीने वाजवला जातो की आजूबाजूला राहणार्या सर्वांना तो वाजतो आहे हे समजावे. हा ढोल वाजत असताना तेथून जाणार्या येणार्या लोकांना हा उपाय परिणामकारक आहे असेच वाटते. मात्र ढोल वाजवण्याच्या या उपायाला सुद्धा जे करचुकवे दाद देणार नाहीत त्यांची मालमत्ता सील करणे एवढाच उपाय शेवटी महानगरपालिकेकडे उरणार आहे.
पुणे महानगरपालिकेने हा उपाय करून बघायला हरकत नाही.
30 सप्टेंबर 2011