माझ्या पिढीतल्या आमच्या कुटुंबियांमधे, मी वयाने सर्वात मोठा आहे. माझे इतर मामे, मावस, आते वगैरे नातेवाईक माझ्यापेक्षा दहा, बारा, पंधरा वर्षांनी तरी लहान आहेत. ही सगळी मंडळी आता चाळीशीच्या, पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. काही दिवसापूर्वी आम्ही सर्व भावंडे काहीतरी समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमलो होतो. मला त्या वेळी एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली. माझ्या बहुतेक भावांची पोटे प्रचंड वाढलेली होती तर त्यांच्या बायका व माझ्या बहिणी अस्ताव्यस्त लठ्ठ झालेल्या होत्या. आता हा लठ्ठपणा काही आमच्याच कुटुंबियांमधली विशेष गोष्ट नाही. जगभरच्या मध्यमवयीन किंवा ज्येष्ठत्वाकडे झुकणार्या व्यक्तींना, वयाबरोबरच वाढणारा लठ्ठपणा किंवा मेदवृद्धी हाच प्रॉब्लेम सतत भेडसावत असतो. हा वाढता मेद आपल्याबरोबरच अनेक मित्रांना घेऊन येत असतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी वगैरे मित्रमंडळी या मेदाच्या आश्रयाखाली मोठ्या आनंदाने आपल्या शरीरात वावरतात. मध्यमवयीन स्त्रियांसाठी तर हा मेदवृद्धीचा प्रॉब्लेम एक शाप बनल्यासारखा झाला आहे.
या मध्यमवयातल्या मेदवृद्धीबद्दल एक अतिशय विस्तृत स्वरूपातला अभ्यास Brigham and Women’s Hospital and Harvard Medical School in Boston या वैद्यकीय संस्थेचे एक डॉक्टर इ-मिन-ली व त्यांचे सहकारी यांनी केला आहे. या अभ्यासाचा अहवाल त्यांनी नुकताच Journal of the American Medical Association या मासिकात प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासासाठी डॉक्टर ली यांनी 34000 निरोगी अमेरिकन महिला निवडल्या होत्या. या महिलांचे सरासरी वय 54 वर्षे होते. हा अभ्यास डॉक्टर ली यांनी 1992 साली सुरू केला. पहिल्या वर्षी, प्रत्येक आठवड्याला या महिलांचे वजन व त्यांनी किती तास व्यायाम केला याची नोंद केली गेली. यानंतर प्रत्येक 3 वर्षांनी या नोंदी प्रत्येक महिलेच्या बाबतीत केल्या गेल्या.
या अभ्यासातून काही रोचक गोष्टी नजरेसमोर आल्या आहेत.
या अभ्यासावरून, मध्यमवयीन महिलांना व्यायामाची किती आवश्यकता आहे हे स्पष्ट होतेच आहे. हा व्यायाम केला नाही तर वजन वाढतच जाणार हे उघड आहे. आपल्याकडच्या चाळीशी पन्नाशीच्या महिला ज्या प्रमाणाबाहेर लठ्ठ व बेढब होतात त्याचे कारण नियमित व्यायामाचा अभाव हेच आहे. या वयात या महिलांना खूप जबाबदार्या असतात. वेळ मिळत नाही या सगळ्या कारणात बरेच तथ्य आहे हे ही खरे. परंतु आपल्यासाठी हा वेळ जर या महिलांनी काढला नाही तर आणखी दहा पंधरा वर्षांनी शरीर लठ्ठ होऊन अनेक व्याधींना आमंत्रण दिल्यासारखेच होणार आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे असे मला वाटते.

- या पंधरा वर्षात या 34000 महिलांचे वजन सरासरीने 2.5 किलोने वाढले होते.
- फक्त 13 % महिलांचे वजन या 15 वर्षाच्या कालात वाढले नाही. व या गटात नियमित रित्या सरासरीने आठवड्याला 7 तास तरी व्यायाम करणार्या महिला बहुसंख्य होत्या. फक्त या गटात महिलांनी आठवड्यात केलेला व्यायाम व त्यांच्या वजनातील वाढ यांच्यात काही संबंध आहे हे दिसले.
- ज्या महिला लठ्ठ होत्या त्यांच्या वजनावर कितीही व्यायाम केला तरी काहीही परिणाम होत नाही असे आढळले आहे.