अबदुल मुहम्मद शेरानी हा 23 वर्षाचा एक इराणी तरूण आहे. इराणच्या दक्षिण भागात असलेल्या दाय्यर(Dayyer) या गावात त्याचे कुटुंब राहते. इराणमधे सर्व तरूणांना 2 वर्षासाठी सैनिकी शिक्षण घ्यावेच लागते. हे शिक्षण झाल्यावर इराणी सरकार या सैनिकांना आडबाजूला असलेल्या छोट्या खेडेगावांत पाठवते. तिथे जरूरीप्रमाणे काही सैनिक शिक्षक बनतात, काही आरोग्यसेवक तर काही शेतीत मदत करतात. सैनिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर, अबदुलला, इराणी सरकारने त्याच्या दाय्यर गावापासून 20 मैलावर असलेल्या कलाऊ(Kalou) या गावात शिक्षक म्हणून पाठ्वण्याचे ठरवले. अबदुलच्या सात भावंडांपैकी पाच भावंडे शिक्षकच असल्याने अबदुलला या कामात रस होताच. त्यामुळेच मोठ्या आनंदाने त्याने ही कामगिरी स्वीकारली. ही
जबाबदारी त्याने स्वीकारली तेंव्हा त्याला कल्पनाही नव्हती की हे काम
त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यातले सर्वात कठिण काम असणार आहे.
हा 23 वर्षाचा तरूण आता कलाऊ शाळेचा मुख्याध्यापक आहे. या शिवाय तो या शाळेचा एकुलता एक शिक्षक, चिटणीस, ग्रंथपाल आणि सफाई कामगारही आहे. याचे कारण आहे या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या. शेरानीच्या शाळेत फक्त चारच विद्यार्थी आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, यूनेस्को या शिक्षणविषयक एजन्सीने, या शाळेला जगातील सर्वात छोटी शाळा हा किताब म्हणूनच दिला आहे.

अबदुल आता पेशाने शिक्षक असला तरी हाडाचा कवी आहे. तो शाळेचे काम सुरू केल्यापासून रोज आपली दैनंदिनी लिहितो. शाळेच्या पहिल्या काही दिवसातली त्याची पाने मोठी वाचनीय आहेत. यात तो लिहितो.” आज आकाश अगदी निरभ्र आणि सुंदर दिसत होते. काल रात्री या वर्षातला प्रथम पर्जन्य वर्षाव झाला. त्यामुळे शाळेचे पटांगण पाण्याने भरून गेले आहे. शाळेचे दार आम्ही उघडले व प्रथम थोडा वेळ, समोर दिसणारा अथांग सागर व त्याच्यावरच्या फेसाळणार्या लाटा व त्यावर डुलणार्या रंगी-बेरंगी नौका बघत आम्ही सर्वजण एकत्रपणे स्वस्थ बसलो. नंतर शाळा सुरू झाली. हमिदा गणिते करत होती. मेहदी स्पेलिंगची चाचणी देत होती तर हुसेन त्याने लिहिलेला निबंध मला वाचून दाखवत होता. मला हे सर्व विद्यार्थी खूप आवडतात. त्यांची भिन्न भिन्न व्यक्तिमत्वे मला भावतात.” या शाळेत तीनच विद्यार्थी असले तरी सरकारी नियमाप्रमाणे सर्व रेकॉर्ड ठेवावेच लागते. अर्थातच हे काम अबदुललाच करावे लागते.

अबदुलने मग त्याच्या शाळेसंबंधी एक ब्लॉग सुरू केला. आपण मदत मागण्यासाठी हा ब्लॉग सुरू केलेला नसून एका छोट्या इराणी खेडेगावाबद्दल आणि तिथल्या शाळेबद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून हा ब्लॉग सुरू केल्याचे अबदुल सांगतो. त्यामुळे या ब्लॉगवर त्याने या गावातली गरिबी किंवा शाळेच्या आर्थिक अडचणींबद्दल कधीच लिहिले नाही. पर्शियन भाषा जाणणार्या एका ऑस्ट्रेलियन वाचकाने या ब्लॉगचे इंग्रजी भाषांतर करणे सुरू केले व हा ब्लॉग खूप मोठ्या संख्येच्या वाचकांपर्यंत पोचला. हा ब्लॉग, स्थानिक वृत्तपत्रे व यूनेस्कोने दिलेला सर्वात छोटी शाळा हा किताब, यामुळे शाळेकडे इराण आणि जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला व अबदुलच्या शाळेचा आर्थिक प्रश्नच संपला.

इराणच्या दक्षिण भागातील एक बंदर ‘बुशेर‘ इथल्या एका देणगीदाराने शाळेची इमारत बांधून दिली तर इराणच्या शिक्षण मंत्रालयाने वर्गातली बाके व एक संगणक भेट दिला. आता या शाळेत ग्रंथालय आहे आणि पुस्तकांची संख्या वाढते आहे. शाळेचा आर्थिक प्रश्न संपला असला तरी अबदुलच्या स्वत:च्या पोटापाण्याचे काय? हा प्रश्न होताच. मग अबदुलने त्याच्या दाय्यर गावात संगणक तज्ञ म्हणून एक नोकरी घेतली. सकाळी तो मोटर सायकलले 20 मैलावरच्या कलाऊ मधल्या शाळेत येतो व दुपारी शाळा संपल्यावर नोकरी करतो. ही माहिती कॅलिफोर्निया मधल्या एका महिलेने वाचली व तिने एक पत्र व एक चांगला गॉगल अबदुलला भेट म्हणून पाठ्वला. ती आपल्या पत्रात म्हणते की इराणच्या या भागात सूर्य किती तळपत असतो याची तिथे राहिलेली असल्याने तिला कल्पना आहे. यामुळे तिने हा गॉगल अबदुलला पाठवला आहे.

अबदुलला त्याच्या एका विद्यार्थिनीचे विशेष कौतुक आहे. त्याच्या शाळेत असलेल्या तीन चार इयत्ता तिने पूर्ण केल्यावर तिला पुढील शिक्षण घेता यावे म्हणून अबदुलने शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहिले. आता शिक्षण मंत्रालयाने पाठवलेली एक बस तिच्या सारख्या आडगावी रहाणार्या मुलांना रोज जवळच्या गावात असलेल्या मोठ्या शाळेत घेऊन जाते. अबदुलला या मुलीच्या जागी नवा विद्यार्थी लगेचच मिळाला.
अबदुलने ‘जगातील सर्वात लहान शाळा‘ म्हणून एक पुस्तक, फारसी भाषेत लिहिले आहे. इराणमधे हे पुस्तक बरेच गाजते आहे. या त्याच्या छोट्या शाळेच्या यशामुळे अबदुल आता एक फाऊंडेशन स्थापन करण्याच्या मागे आहे. या फाऊंडेशनने कलाऊ सारख्या आडगावामधल्या शाळांना मदत करावी अशी त्याची कल्पना आहे.
1 मार्च 2010