काहीही
उपाय केले, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कुत्र्याचे शेपुट जसे
वाकडेच रहाते तसेच बहुदा भारतातल्या साखर उद्योगाचे आहे.माझ्या स्मरणात आहे
तेंव्हापासून म्हणजे कमीत कमी गेली तीस ते चाळीस वर्षे हा साखर उद्योग,
अतिरिक्त उत्पादन आणि तीव्र टंचाई यांच्या दर चार पाच वर्षांनी येणार्या
चक्रात अडकलेला आहे. अनेक अर्थ शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ यांनी यावर शोधनिबंध
लिहिलेले आहेत. सरकारी यंत्रणा असे होऊ नये म्हणून अनेक फर्माने काढत असते
शेतकर्यांना, साखर कारखान्यांना सल्ले देत असते. परंतु ये रे माझ्या
मागल्या या सारखे हे कडू चक्र चालूच आहे.
भारत हा ब्राझिलनंतरचा जगातला द्वितिय क्रमांकाचा साखरेचा उत्पादक असला
तरी प्रथम क्रमांकाचा ग्राहक आहे. आपण भारतीय लोक वर्षाला 23 मिलियन टन
एवढी साखर फस्त करत असतो. 2007-08 मधे भारतातले साखरेचे उत्पादन 28 मिलियन
टनाच्या पुढे झाले होते त्यामुळे भारतातून साखरेची निर्यात होत होती. या
वर्षी हे उत्पादन 14 ते 17 मिलियन टन एवढेच होईल असा अंदाज आहे त्यामुळे
साखर आयात करण्यास पर्याय उरलेला नाही.
भारत साखरेचा मोठा निर्यातदार व आयातदार आलटून पालटून होत असल्याने आंर्तराष्ट्रीय बाजारातल्या साखरेच्या किंमती भारतातील साखरेच्या उत्पादनाप्रमाणे बदलत रहातात. जेंव्हा भारतात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होते तेँव्हा या किमती तळाला जातात व उत्पादकांचे नुकसान होते तर जेंव्हा भारतात साखरेचे उत्पादन कमी होते तेंव्हा याच किंमती आकाशाला पोचतात व ग्राहक भरडून निघतो.
भारतात सर्वात जास्त ऊसाचे पीक हे उत्तर प्रदेश या राज्यामधून घेतले जाते. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातून फेरफटका मारला तर एखाद्या समुद्राप्रमाणे पसरलेली उसाची शेते सगळीकडे दिसत असत. आज या उसांच्या शेतामधे मधून मधून इतर पिके घेतलेलीही दिसतात. दोन वर्षांपूर्वी साखर कारखान्यांनी, साखरेचे भाव कोसळल्यामुळे, उसाला अतिशय कमी भाव दिला होता. त्यामुळे साहजिकच शेतकर्यांनी दुसरी पिके घ्यायला सुरवात केली. उसाचे पीक हातात येण्यास 18 महिने लागतात. त्यामुळे उसाच्या कमी झालेल्या लागवडीचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. या वर्षी मॉंसूनचा पाऊसही खूपच कमी प्रमाणात झाला आहे. उसाला पाणीही खूप लागते त्यामुळे उसाचे पीक हातात येण्यास आणखी उशीर होईल असे शेतकरी सांगत आहेत.
एकदा साखरेचे भाव आकाशाला भिडले की साखर कारखाने त्यांना जो ऊस उपलब्ध होतो त्याला बरीच जास्त किंमत देतात. ही किंमत मिळू लागली की शेतकरी जास्त जास्त जमीन परत उस लागवडीखाली आणतात. परंतु हे पीक 18 महिन्यानंतरच तयार होणार असल्याने, ते जेंव्हा तयार होते तेंव्हापर्यंत साखरेचे भाव परत कोसळलेले असतात व शेतकर्यांचे नुकसानच होते.
साखरेचे हे कडू चक्र गेले लित्येक वर्षे चालू आहे. याला उपाय एकच आहे. तो म्हणजे ऊस लागवडीखाली किती क्षेत्र आणायचे याचे मोठ्या प्रमाणात नियोजन करणे. परंतु आपल्या शेतात कोणते पीक घ्यायचे हे प्रत्येक शेतकरी त्याच्या कल्पनेप्रमाणे ठरवत असल्याने या नियोजनाची कल्पना फक्त कागदावरच राहिली आहे.
भारतातल्या साखरेच्या या चक्राचा फायदा ब्राझिलमधल्या शेतकर्यांना खरे म्हणजे व्हायला पाहिजे. परंतु तो होत नाही कारण ब्राझिलमधला ऊस हा साखरेऐवजी एथेनॉलच्या उत्पादनासाठी बराच वापरला जातो.
भारतातले अनेक कष्टकरी गरिब लोकांसाठी, भरपूर साखर व दूध घातलेला एक छोटा कप चहा हा रोजच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. या चहाच्या एका पेल्याच्या जोरावर ते अमाप कष्ट करू शकतात. साखरेची किंमत त्यामुळेच अतिशय संवेदनाशील विषय, निदान भारतासाठी तरी आहे.
13 सप्टेंबर 2009