Monday, 8 September 2014

मॅकरिची जलाशय

सिंगापूरला येणार्‍या सर्वसाधारण पर्यटकांची पाउले, सहसा ज्या प्रेक्षणीय स्थळांच्याकडे, अज्ञानामुळे असेल किंवा वेळेच्या अभावाने असेल, वळत पण नाहीत, त्यातलीच, पण मला अतिशय आवडणारी एक जागा म्हणजे मॅकरिची जलाशय.

Mck d


तसे बघायला गेले तर हा जलाशय अतिशय जुना आहे. इ.स. 1867मधेच याचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे असेल किंवा या जलाशयाच्या नैसर्गिक रचनेमुळे असेल, पण तलावाच्या सभोवती अतिशय घनदाट अशी झाडी आहे.

Mck m


जलाशयाभोवतीच्या काही भागात तर प्राथमिक स्वरूपाचे रेन-फॉरेस्ट आहे. या जलाशयाच्या संपूर्ण परिमितीला लाकडी फळ्यांची पायवाट(Board Walk) केलेली आहे. या वाटेने चालताना कित्येक वेळा तुम्ही जंगलातूनच चालत जाता तर कित्येक वेळा छोट्या छोट्या लाकडी पुलांवरून जलाशयाची आत घुसलेली टोके ओलांडावी लागतात. या तलावाच्या दर्शनी भागाचे आधुनिकीकरण, 12 मिलियन सिंगापूर डॉलर्स खर्च करून नुकतेच सिंगापूरच्या शासनाने पूर्ण केले आहे.

Mck j

यामुळे या जलाशयाचा परिसर आता एक अतिशय सुंदर पिकनिक स्पॉट झाला आहे.


Mck p

नुसते फिरायचे ठरविले तरी कुठे कुठे जायचे असा प्रश्न पडतो.


Mck k

थंडगार सावलीत एखाद्या झाडाखाली पथारी पसरून पिकनिक करावे.


Mck g

मुलांच्या बरोबर खेळावे.


Mck e

काही लोक तर विवाह करण्यासाठी पण येथे येतात.


Mck l

तलावाच्या काही भागात कॅनू (Canoe) चालवण्याची सोय आहे. हवेत चालायचे असले तर ट्रीटॉप वॉक आहे. आणि भरपूर जेवण झाल्यावर सुस्ती आली तर एखाद्या बाकावर ताणून देता येते.


Mck f

तुम्हाला मुले मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर जर छान मजेचा वेळ घालवायचा असेल तर मॅकरिचीला जरूर भेट द्या.


Mck h

पण भरपूर वेळ ठेवून घाईगर्दीने नाही.


Mck b


आणि अर्थातच सिंगापूरच्या प्रसिद्धीप्रमाणे तुम्हाला या परिसरात कुठे कागदाचा कपटाही दिसणार नाही.


2 ऑगस्ट 2009