सिंगापूरमधले
वास्तव्य संपवून, जेवढ्या वेळा मी भारतात परतलो आहे त्या प्रत्येक वेळी एक
गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत राहिली आहे. इथे सिंगापूरला, सडसडीत स्त्री
पुरुष बघण्याची एवढी सवय डोळ्यांना होते की भारतात विमानतळापासूनच, जवळपास
प्रत्येक माणूस मला जाड वाटत रहातो. माझे मित्र, नातेवाईक हे सगळे मला दर
वेळी जास्त जाड, दुहेरी हनुवटीचे, पोट सुटलेले दिसतात. परिचित महिलांचे तर
विचारूच नका. त्यातली प्रत्येक स्त्री ही प्रमाणाच्या बाहेर अतिशय स्थूल
झाली आहे हे जाणवत राहते. माझी इतके दिवस अशी समजूत होती की मी परिचितांची,
इथल्या लोकांशी मनात तुलना करत असल्याने, मला ते सर्व, जाडू वाटतात. परवा
एक दोन लेख वाचनात आले आणि असे लक्षात आले की हा माझ्या मनाचा खेळ नाही.
सत्य परिस्थिती आहे.

भारतातील लठ्ठ लोकांची राज्यवार असलेली संख्या या नावाचा एक अभ्यासलेख मी बघितला. या लेखाप्रमाणे सर्वात लठ्ठ लोक असलेल्या तीन राज्यांचे आकडे असे आहेत.
प्रथम क्रमांक- पंजाब 30.3% पुरुष, 37.5 % स्त्रिया प्रमाणाबाहेर लठ्ठ
द्वितिय क्रमांक- केरळ 24.3% पुरुष, 34% स्त्रिया प्रमाणाबाहेर लठ्ठ
तृतिय क्रमांक- गोवा 20.8% पुरुष, 27 % स्त्रिया प्रमाणाबाहेर लठ्ठ
राजधानी दिल्लीमध्या 76% टक्के महिलांचे पोट प्रमाणाबाहेर सुटलेले आहे
महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या तीन मधे नसला तरी बराच वरचा आहे. तुम्ही म्हणाल की हे सगळे मोघम आहे. प्रमाणाबाहेर लठ्ठ म्हणजे काय? लठ्ठपणा मोजण्याची दोन मुख्य परिमाणे आहेत. पहिले म्हणजे ‘बॉडी मास इंडेक्स’ (BMI). भारत सरकारच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीनतम आकड्यांनुसार. एखाद्या व्यक्तीचा BMI हा जर 23 पेक्षा कमी असला तर ती लठ्ठ नाही. 23 ते 25 यामधे BMI असला तर ती व्यक्ती लठ्ठ समजावी व 25 पेक्षा जास्त BMI असलेली व्यक्ती ही अतीलठ्ठ (Obese) समजावी. या BMIच्या आकड्यावरून फारसा काही बोध होत नाही असे मला वाटते. आपल्याला उंची, फूट व इंचात माहिती असते तर वजन किलोग्रॅम मधे. त्यामुळे 23 व 25 या दोन BMI साठी वजन व उंचीचा एक सोपा तक्ता खाली दिला आहे.
|
उंची
|
23 BMI
|
25 BMI
|
|
|
साठी वजन
|
साठी वजन
|
|
इंचात
|
किलोग्रॅम
|
किलोग्रॅम
|
|
58
|
50
|
54
|
|
59
|
52
|
56
|
|
60
|
54
|
58
|
|
61
|
55
|
60
|
|
62
|
57
|
62
|
|
63
|
59
|
64
|
|
64
|
61
|
66
|
|
65
|
63
|
68
|
|
66
|
65
|
70
|
|
67
|
66
|
72
|
|
68
|
69
|
75
|
|
69
|
70
|
77
|
|
70
|
73
|
79
|
|
71
|
75
|
81
|
|
72
|
77
|
84
|
|
73
|
79
|
86
|
|
74
|
81
|
88
|
|
75
|
84
|
91
|
|
76
|
86
|
93
|
आपल्या उंचीच्या आडव्या रांगेत दुसर्या व तिसर्या स्तंभात दिलेल्या वजनांशी आपल्या वजनाची तुलना करावी. आपले वजन दुसर्या उभ्या स्तंभात दिलेल्या वजनापेक्षा कमी असले तर आपण लठ्ठ नाही. दुसर्या व तिसर्या स्तंभातील वजनांच्या मधे असले तर आपण लठ्ठ आहोत. ते तिसर्या स्तंभातील वजनाइतके किंवा जास्त असले तर आपण लठ्ठंभारती (Obese) आहोत हे समजावे.

लठ्ठपणाचे दुसरे परिमाण म्हणजे ‘कंबर व ढुंगण यांच्या परिमितींचे गुणोत्तर’ (Waist to Hip Ratio). साध्या कपडे मोजण्याच्या टेपने(ही सगळ्या घरांत असते.) या दोन परिमिती कोणालाही मोजता येतात. कंबरेच्या परिमितीला ढुंगणाच्या परिमितीने भागले की हे गुणोत्तर मिळते. लठ्ठ्पणा व हे गुणोत्तर यांचा तक्ता असा आहे.
पुरुष(गुणोत्तर) स्त्रिया(गुणोत्तर) लठ्ठपणा
0.95 किंवा खाली 0.80 किंवा खाली लठ्ठपणा नाही
0.96 ते 1.0 0.81 ते 0.85 लठ्ठ
1.0 आणि पुढे 0.85 आणि पुढे अतीलठ्ठ
काही प्रगत राष्ट्रांच्यातल्या लठ्ठपणांच्या टक्केवारीत भारतामधील लठ्ठपणा कमी आहे हे खरे असले तरी भारत विकसनशील देशांमधील एकमेव असा देश आहे की ज्याच्यामधल्या लठ्ठपणाबद्दल, इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑन ओबिजिटी ने भारतामधल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भारताला सभासद करून घेतले आहे.

1997 मधे भारतातील अतीलठ्ठपणाचे प्रमाण फक्त 7 ते 9% होते. त्यात एवढी प्रचंड वाढ कशी आणि का झाली असेल ही चिंतेची बाब आहे. भारतीय जेवणात तळलेले व भरपूर तेलतूप वापरलले पदार्थ खूप असतात. या शिवाय नवीन फास्ट फूडची आवड वाढत चालली आहे. या शिवाय व्यायाम, खेळ यांचीही आवड नवीन पिढीमधे कमीकमीच होत चालली आहे.
या लठ्ठपणाबरोबर येणार्या रोगांची नुसती आकडेवारी बघितली तरी धडकी भरते. सध्या भारतात 2.5 कोटी मधुमेही आहेत. 2025 पर्यंत ही संख्या 5.7 कोटीपर्यंत फुगेल असा अंदाज आहे. या शिवाय लठ्ठपणामुळे येणारे र्हदयविकारासारखे रोग निराळेच.
भारतात अक्षरश: लाखो लोकांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असते. पण याच वेळी सुशिक्षित, उच्चभ्रू वर्ग मात्र लठ्ठंभारती होत चालला आहे. य़ा विरोधाभासाला काय म्हणायचे?
25 जुलै 2009