Showing posts with label नैसर्गिक सौंदर्य. Show all posts
Showing posts with label नैसर्गिक सौंदर्य. Show all posts

Friday, 12 September 2014

नयनरम्य कनेक्टर

सिंगापूरची एक खासियत आहे. अगदी रोजच्या जाण्या येण्याच्या वाटेवर सुद्धा तुम्हाला अशा काही जागा दिसतात की बघतच रहावे. विषुव वृत्तावर असल्याने निसर्गाने सौंदर्याची उधळण उदारपणे केलेलीच असते. परंतु ती कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही याची काळजी घेऊन इथले सरकार रस्ते, पूल किंवा इमारती बांधत असते.


सिंगापूर आणि त्याच्या उत्तरेला असलेला मलेशिया, यांच्यामधे ‘सेलात जोहर’ नावाची समुद्राची एक अरुंद, म्हणजे अगदी सहज पोहून जाता येईल एवढीच रुंद, अशी पट्टी आहे. ही पट्टी अरुंद असली तरी समुद्राचाच भाग असल्याने त्याला भरती ओहटी ही येतेच. भरतीचे पाणी सगळीकडे पसरू नये व वारंवार बदाबदा पडणार्‍या पावसाचे पाणी वाहून जावे म्हणून सिंगापूर सरकारने बर्‍याच ठिकाणी कॅनॉल किंवा नदीसारखे दिसणार्‍या खाड्या बांधल्या आहेत. सिंगापूरच्या अगदी उत्तरेला असलेल्या अशाच एका खाडी कॅनॉलच्या बांधावर, जॉगर्स आणि बायकर्स यांच्यासाठी एक रस्ता आहे. आम्ही या रस्त्याला कनेक्टर म्हणतो.

blog1


रोज फिरण्याची सवय असल्याने मी बर्‍याच आखीव रेखीव रस्त्यांवरून पायी चालत फिरलेलो आहे. अमेरिकेतील मेपल किंवा मॅग्नोलिया वृक्षांच्या ओळींच्यामधे आंखलेले रस्ते असेच खूप छान असतात. पण सिंगापूरच्या या कनेक्टरचे वैशिट्य काही आगळेच आहे.

blog2


या रस्त्याच्या एका कडेला असलेल्या कॅनॉलच्या पल्याड काठाला अगदी घनदाट असे रेनफॉरेस्ट आहे.

blog7


आदल्या दिवशी पाउस पडून गेलेला असला की या जंगलाच्यातून दुसर्‍या दिवशी सकाळी वाफा निघत असतात. त्या धूसरपणामधे या जंगलाचे सौंदर्य इतके खुलून दिसते की पहातच रहावे.

blog3


दुसर्‍या काठाला रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुलझाडे लावलेली आहेत व मागे नैसर्गिक हिरवळ नेहमीच असते. या हिरवळीमागे उंच उंच वृक्षही दिसतात.

blog9


साधारण 2 किलोमीटर चालले की ‘क्रॅब व्हिलेज’ म्हणून एक रेस्टॉरन्ट लागते. कोणाला चहा पाणी करायचे असले तर सोय आहेच.

blog5


blog6


यानंतर हा रस्ता सरळ ‘सेलत जोहर’ पर्यंत जातो. मध्यभागी छोटी घरे देसत आहेत ती मलेशियामधली आहेत.

blog4


रस्ता अतिशय शांत असतो. आवाज ऐकू येतात ते असंख्य पक्षांच्या विविध प्रकारच्या चित्कारण्याचे आणी मधून मधून धापा टाकत जाणार्‍या जॉगर्स व वेगाने जाणार्‍या बायकर्सचे.

blog11


समुद्र दिसला की माझ्या मनाला कुठेतरी स्वतंत्रपणाची जाणीव होते. पण आता परतण्याची वेळ झालेली असते.

blog12


blog10


4 सप्टेंबर 2009