भारताचे सर्वात
प्रभावी ब्रम्हास्त्र असे ज्याचे वर्णन करता येईल त्या अग्नी 5 या रॉकेटचे तिसरे
यशस्वी प्रक्षेपण आज डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या
वैज्ञानिकांनी आज आंध्रमधील व्हीलर बेटावरून यशस्वी रित्या केले.
1.1 ट्न वनाच्या अण्वास्त्राचा मारा 5000 किमी अंतरावर हे रॉकेट करू शकते.
आजच्या प्रक्षेपणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एका
कॅनिस्टरच्या द्वारा केले गेले. कॅनिस्टर म्हणजे साधारणपणे चौरस आकार असलेली एक
नलिका! या नलिकेच्या आत असलेले रॉकेट जमिनीवर प्रज्वलित न करता, गॅसच्या प्रेशरने वर फेकले जाईल अशी व्यवस्था
केलेली असते. त्या प्रमाणे अग्नी 5 आकाशात 30 मीटर वर फेकण्या आले व तेथे त्याच्या
पहिल्या इंजिनाचे प्रज्वलन सुरू झाले. 3 टप्याची रॉकेट इंजिने बसवलेले हे रॉकेट 500
किमी उंचीपर्यंत नेण्यात आले व तेथून ते खाली येत असताना हवेच्या घर्षणामुळे
निर्माण होणार्या 3000 अंश सेल्सस तपमानाचा यशस्वी सामना करून या रॉकेटच्या
नाकावर बसवलेल्या डमी अण्वास्त्राचा अचूक मारा, बंगालच्या उपसागरात असलल्या नियोजित स्थानावर करण्यात हे रॉकेट यशस्वी
ठरले. या स्थानाजवळ नांगर टाकून उभ्या असलेल्या
नौदलाच्या 2 बोटी व इतर ठिकाणची रडार संयंत्रे यांनी या रॉकेटच्या
प्रक्षेपण कक्षाची अचूक नोंद संपूर्ण प्रक्षेपणाच्या दरम्यान केली.
या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता अग्नी-5 भारतीय
सैन्यामध्ये एक वर्षभरात दाखल होईल असे मानले जाते.
31 जानेवारी
2015

