कंबोडिया मधल्या प्राचीन मंदिरांना भेट दिल्यावर एक गोष्ट विशेष जाणवते. ती म्हणजे या देशाच्या प्राचीन संस्कृतीमधे अप्सरा या संकल्पनेला असलेले महत्व. ही संकल्पना कंबोडियाच्या ख्मेर संस्कृतीने हिंदू पुराणांच्यातूनच उचलली होती. तरीही इथे या संकल्पनेला असाधारण महत्व प्राप्त झालेले दिसते. याचे कारण बहुदा ख्मेर राजांनी हिंदू पुराणांच्यातला राजा हा ईश्वरी अवतार किंवा ईश्वरी अंश असण्याची कल्पना उचलली यात असावे. स्वर्गातल्या देवांच्याभोवती जर अप्सरा असतात तर ईश्वरी अवतार असलेल्या राजा भोवती अप्सरा असणारच अशी समजूत येथे होती असे दिसते. त्यामुळे सर्व अंगकोर मंदिरांच्यात अप्सरांची अनेक शिल्पे आहेत.
अप्सरांची शिल्पे असली तरी त्या शिल्पांच्यातील अप्सरा काही एका साच्यातून काढल्यासारख्या दिसत नाहीत. डोक्यावरचे मुगुट, केशरचना, कानातली कर्णफुले, गळ्यातले हार, कंबरपट्टा, अंगावरचे वस्त्र व त्यावरचे डिझाईन या सगळ्या गोष्टी ही मंदिरे 9व्या शतकापासून 12व्या किंवा 13व्या शतकापर्यंतच्या म्हणजे 400 वर्षाच्या कालखंडात बांधली गेलेली असल्याने त्यांच्यातील या अप्सरा शिल्पांच्या मधे पुषकळच विविधता आढळते. या शिल्पांच्यात तत्कालीन स्त्रियांच्या वेषभूषेचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला जाणवते. या अप्सरा शिल्पांचा हा एक धावता आढावा आहे असे म्हणता येईल.
मी बघितलेल्या मंदिरांमधले सर्वात जुने असलेले अप्सरा शिल्प, प्रेह रूप या मंदिरात मला आढळले. हे मंदिर 10व्या शतकाच्या मध्याला बांधले गेले होते. या मंदिरातली अप्सरा त्या मानाने कमी वस्त्रालंकार घातलेली बांध्याने सडपातळ व उंच वाटते. मस्तकावर मुगुट असल्यासारखे वाटत नाही. चेहेरपट्टी पण निराळी वाटते. एकूणच कोरलेले बारकावे कमी प्रमाणात दिसतात.
बांते स्राय मंदिरातल्या अप्सरा दहाव्या शतकाच्या अखेरीस कोरलेल्या आहेत. या अप्सरा शिल्पांच्यात डोक्यावर मुगुट नाहीतच. डोक्यावर केशरचना केल्यासारखी दिसते आहे. कर्ण फुले व कंबरपट्टा यांच्यावरचे डिझाईन अगदी इंट्रिकेट वाटते. अंगावरचे वस्त्र नेसण्य़ाची पद्धत निराळीच आहे. हातात घातलेली कंगणे इतर मंदिरातल्या शिल्पांपेक्षा निराळी दिसतात.
यानंतरच्या अप्सरांची शिल्पे अंगकोर वाट मंदिरातली म्हणजे 12व्या शतकातली आहेत.
अंगकोर मंदिरांची देखभाल करणारी जी संस्था आहे त्या संस्थेचे नाव अप्सरा ऍथॉरिटी आहे. एका प्रमुख चौकात आपल्याला अप्सरा शिल्प दिसते. रस्त्या रस्त्यावर अनेक दुकाने अप्सरा हा शब्द आपल्या नावात बाळगताना दिसतात. यावरून आधुनिक कंबोडियाने सुद्धा ही अप्सरा परंपरा जपण्याचे ठरवले आहे असे आपल्याला जाणवत राहते.
29 December 2010
अप्सरांची शिल्पे असली तरी त्या शिल्पांच्यातील अप्सरा काही एका साच्यातून काढल्यासारख्या दिसत नाहीत. डोक्यावरचे मुगुट, केशरचना, कानातली कर्णफुले, गळ्यातले हार, कंबरपट्टा, अंगावरचे वस्त्र व त्यावरचे डिझाईन या सगळ्या गोष्टी ही मंदिरे 9व्या शतकापासून 12व्या किंवा 13व्या शतकापर्यंतच्या म्हणजे 400 वर्षाच्या कालखंडात बांधली गेलेली असल्याने त्यांच्यातील या अप्सरा शिल्पांच्या मधे पुषकळच विविधता आढळते. या शिल्पांच्यात तत्कालीन स्त्रियांच्या वेषभूषेचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला जाणवते. या अप्सरा शिल्पांचा हा एक धावता आढावा आहे असे म्हणता येईल.
मी बघितलेल्या मंदिरांमधले सर्वात जुने असलेले अप्सरा शिल्प, प्रेह रूप या मंदिरात मला आढळले. हे मंदिर 10व्या शतकाच्या मध्याला बांधले गेले होते. या मंदिरातली अप्सरा त्या मानाने कमी वस्त्रालंकार घातलेली बांध्याने सडपातळ व उंच वाटते. मस्तकावर मुगुट असल्यासारखे वाटत नाही. चेहेरपट्टी पण निराळी वाटते. एकूणच कोरलेले बारकावे कमी प्रमाणात दिसतात.
बांते स्राय मंदिरातल्या अप्सरा दहाव्या शतकाच्या अखेरीस कोरलेल्या आहेत. या अप्सरा शिल्पांच्यात डोक्यावर मुगुट नाहीतच. डोक्यावर केशरचना केल्यासारखी दिसते आहे. कर्ण फुले व कंबरपट्टा यांच्यावरचे डिझाईन अगदी इंट्रिकेट वाटते. अंगावरचे वस्त्र नेसण्य़ाची पद्धत निराळीच आहे. हातात घातलेली कंगणे इतर मंदिरातल्या शिल्पांपेक्षा निराळी दिसतात.
यानंतरच्या अप्सरांची शिल्पे अंगकोर वाट मंदिरातली म्हणजे 12व्या शतकातली आहेत.
या अप्सरांच्या शिल्पांच्यात डोक्यावर उंच
असा मुगुट आहे. हातात कंगण नसून ब्रेसलेट सारखा दागिना आहे. वस्त्र
नेसण्याची पद्धतही निराळीच आहे.
या शिल्पामधल्या अप्सरांच्या डोक्यावर मुगुटाऐवजी केश रचना आहे. एक अप्सरा गळ्यातल्या हाराशी खेळताना दाखविली आहे.
या शिल्पांच्यात कानातील कर्णफुले व गळ्यातील हार हे अतिशय सुंदर डिझाईनचे वाटतात.
या अप्सरा जरा ठेंगण्या ठुसक्या वाटतात. डोक्यावर बुद्धाच्या डोक्यावर
दाखवतात तशा प्रकारची केशरचना आहे. गळ्यातला हार, कंबरपट्टा अगदी साध्या
रचनेचा वाटतो. टा प्रॉम मंदिरातल्या अप्सरा बाराव्या शतकाच्या अखेरीस किंवा 13व्या शतकाच्या सुरवातीस कोरल्या गेल्या आहेत.
या शिल्पांच्यातील अप्सरांचे मुगुट भारतीय पद्धतीचे वाटतात. केसांच्या लांब बटा दाखवल्या जात आहेत. चेहरपट्टी परत निराळीच आहे.
प्राचीन कालच्या या वेषभूषेत
स्त्रिया उत्तरीय वापरत नसत ही एक बाब सोडली तर बाकी सर्व वेषभूषा
सध्याच्या कालातही वापरणे सहज शक्य आहे याचे प्रात्यक्षिक कंबोडियाचे
राष्ट्रीय नृत्य ‘अप्सरा बॅले‘ याचा एखादा कार्यक्रम बघितला तरी लक्षात येते. हे राष्ट्रीय नृत्य पूर्वी फक्त राजे व वरिष्ठ अधिकारी बघू शकत असत. कंबोडियाचा एक राजा सिंहनूक याच्या मुलीने या प्राचीन कलेला परत एकदा मानाचे स्थान प्राप्त करून दिलेले आहे. आता या नृत्याची ऍकडमी कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह येथे आहे व हे नृत्य आता खूपच लोकप्रिय झाले आहे. 10 ते 15 वर्षाच्या साधनेनंतर नृत्यांगना या नृत्यात पारंगत हो ऊ शकतात. हात व भाव मुद्रा यांच्या सहाय्याने या नृत्याची कथा पुढे सरकते.अंगकोर मंदिरांची देखभाल करणारी जी संस्था आहे त्या संस्थेचे नाव अप्सरा ऍथॉरिटी आहे. एका प्रमुख चौकात आपल्याला अप्सरा शिल्प दिसते. रस्त्या रस्त्यावर अनेक दुकाने अप्सरा हा शब्द आपल्या नावात बाळगताना दिसतात. यावरून आधुनिक कंबोडियाने सुद्धा ही अप्सरा परंपरा जपण्याचे ठरवले आहे असे आपल्याला जाणवत राहते.
29 December 2010