परवा गप्पागोष्टी करत असतांना माझा मुलगा मला सहजपणे म्हणाला की ” बाबा तुझे ब्लॉग वाचायला आता पूर्वीसारखी मजा येत नाही.” त्याचे शब्द ऐकून मी जरा चमकलोच. स्पष्ट सांगायचे तर खरे म्हणजे मला थोडेसे वाईटही वाटले. मी त्याला मग विचारलेच की तो असे का म्हणतो आहे? त्याच्या मते माझे ब्लॉग अजूनही वाचनीय असतात, विषय नवीन असतात, तरी पूर्वीचे ब्लॉग वाचल्यावर जे समाधान, मजा वाटायची ती आता का कोण जाणे तितकीशी वाटत नाही. त्याचे हे मत ऐकल्यावर मी साहजिकच थोडाफार अंतर्मुख झालो. आपल्या ब्लॉग्सची गुणवत्ता कमी होते आहे हे मनाला लागून राहिले.
या ब्लॉग्सच्या प्रांगणात मी तसा काही नवीन किंवा अनभिज्ञ आहे असे म्हणता येणार नाही. मी माझा इंग्रजीमधला पहिला ब्लॉग सुलेखाब्लॉग्सच्या (http://chandrashekhar.sulekha.com/default.htm) माध्यमातून नोव्हेंबर 2005 मधे लिहिला होता. तेंव्हापासून आजपर्यंत मी इंग्रजीमधून ब्लॉगिंग करतोच आहे. माझा मराठी ब्लॉग मी जानेवारी 2009 मधे वर्डप्रेसच्या माध्यमातून सुरू केला खरा, परंतु निरनिराळ्या तांत्रिक अडचणींमुळे मे किंवा जून महिन्यानंतरच खर्या अर्थाने मी ब्लॉगपोस्ट्स मराठीतून लिहिण्यास सुरवात केली.
सुलेखावरचे माझे जुने इंग्रजी ब्लॉग्स आणि अक्षरधूळ सुरू करण्याआधीचे माझे मराठी लेख( जे मी अक्षरधूळवर टाकले आहेतच.) यांची पुस्तके बनवून मी आंतरजालावर टाकली आहेत. या पुस्तकाना सत्तर हजारांवर हिट्स मला 8 ते 10 महिन्यात मिळाले आहेत. म्हणजेच हे लेखन वाचकांना आवडले आहे. या लेखनाच्या बरोबर गेल्या काही महिन्यातल्या लेखनाची तुलना करावी म्हणून मी असा विचार केला की नवीनतम लेखांचे जर आता एखादे पुस्तक बनवायचे असले तर कोणते लेख निवडावेत? जेंव्हा मी निवडलेले लेख हाताच्या बोटांनी मोजण्याच्या पलीकडे जाईनात, तेंव्हाच माझा मुलगा असे का म्हणतो आहे हे माझ्या ध्यानात आले. माझ्या ब्लॉग्सची गुणवत्ता कमी झाली आहे ही त्याची तक्रार खरीच आहे.
गुणवत्ता कमी होण्याची कारणे तरी काय असावीत? असा विचार मी साहजिकच करू लागलो. सुलेखाब्लॉग्स वरचे माझे जुने ब्लॉग्स चाळत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या वेळी प्रत्येक महिन्यात मी एक किंवा फार तर दोन ब्लॉग्स लिहित आलो आहे. यातल्या जवळजवळ प्रत्येक ब्लॉगला मला तीन ते चार हजार वाचक लाभलेले आहेत. त्याच्या तुलनेने मी अक्षरधूळवर दर महिन्याला पंधरा ते वीस ब्लॉग तरी सरासरीने लिहित आलो आहे. म्हणजेच संख्या आणि गुणवत्ता यांचे नाते काही माझ्या ब्लॉग्सच्या बाबतीत तरी बहुदा जुळत नाहीये. मला आठवते की पूर्वी मला जेंव्हा एखाद्या विषयावर काही लिहावे असे वाटत असे किंवा काही लिहिण्याची उर्मी येई त्याच वेळी मी लेखन करत असे. आता अक्षरधूळवर काहीतरी लिहायचे ही एक सवय झाली आहे.
ब्लॉगला काही लोकांनी अनुदिनी असे नाव दिले आहे. हे नाव तितकेसे योग्य आहे असे मला तरी वाटत नाही. या नावामुळे डायरी लिहिणे आणि ब्लॉगपोस्ट लिहिणे यातला मूलभूत फरकच पुसला जातो आहे. ट्विटर किंवा गूगल बझ वर लिहिणे आणि ब्लॉग लिहिणे यात तसाच मूलभूत फरक आहे. कोणता सिनेमा बघितला? किंवा कोठे जेवलो? अशी पोस्ट्स ट्विटर किंवा बझवर दिली तरी चालतात. ती ब्लॉगपोस्ट म्हणून दिली तर हास्यास्पद दिसतील असे मला तरी वाटते. ब्लॉगवरचे लेखन हे शाश्वत स्वरूपाचे असते. त्यामुळे त्याचा दर्जाही तसाच हवा.
वर्डप्रेसवरून प्रसिद्ध होणार्या ब्लॉग्सची कोणत्या तरी पद्धतीने तुलना करून, श्रेष्ठतम ब्लॉग कोणता आहे किंवा कोणते पोस्ट अद्वितीय आहे या संबंधीची काही नावे वर्डप्रेसचे व्यवस्थापन प्रसिद्ध करत असते. (अर्थात या यादीत असलेल्या ब्लॉग्सबद्दल हे शब्द वापरणे जरा हास्यास्पदच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.) या यादीत आपले नाव झळकावे अशी जर इच्छा असली तर रोज एक ब्लॉगपोस्ट प्रसिद्ध करणे गरजेचे असते. ते केले नाही तर तुमचा ब्लॉग या यादीतून बाहेर फेकला जातो. आपले नाव या यादीत झळकत रहावे अशी प्रत्येक ब्लॉगरच्या मनात इच्छा ही स्वाभाविकपणेच असते. यामुळेच बहुदा काहीही करून मी माझे ब्लॉगपोस्टस रोज अपलोड करतो आहे. यामुळे गुणवत्ता खालावत चालली आहे याकडे बहुदा माझे पाहिजे तेवढे लक्ष गेले नसावे.
ब्लॉगपोस्टला येणारे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया हा असाच एक वादाचा मुद्दा. पुष्कळ ब्लॉगर्स असे मानतात की त्यांच्या ब्लॉगला येणार्या प्रत्येक प्रतिसादाला त्यांनी उत्तर हे दिलेच पाहिजे. मला हे पटत नाही. ब्लॉगपोस्ट ही काही चॅट पेटी नव्हे. त्यासाठी ट्विटर किंवा बझ सारखी माध्यमे उपलब्ध आहेत. ब्लॉग लेखकाने आपले म्हणणे ब्लॉगमधे लिहिलेलेच असते. त्यात असणारी चूक कोणी दर्शविली किंवा नवीन कोणता मुद्दा उपस्थित केला तर लेखकाने जरूर उत्तर दिले पाहिजे. अन्यथा ब्लॉग छान आहे या प्रतिसादाला उत्तर देणे मला तरी योग्य वाटत नाही.
आपल्या ब्लॉगपोस्टची गुणवत्ता कशी सुधारावी? यासाठी काही पाउले उचलावी असे मला वाटते आहे. प्रथम म्हणजे यापुढे मी जेंव्हा मला लिहावेसे वाटेल तेंव्हाच ब्लॉगपोस्ट लिहिणार आहे. दुसरे म्हणजे वर्डप्रेस व्यवस्थापनाच्या या श्रेष्ठतम आणि अद्वितिय ब्लॉग्सच्या याद्या मी माझ्या संगणकाच्या पडद्यावरून काढून टाकणार आहे. आणि मुख्य म्हणजे ब्लॉग लिहिला तरी तो नंतर मी प्रसिद्ध करणार्या माझ्या नव्या पुस्तकात घालण्याच्या योग्य आहे असे मला वाटले तरच मी तो प्रसिद्ध करणार आहे.
ब्लॉग्सची संख्या व त्यामुळे येणारे जास्ती हिट्स यापेक्षा जास्त गुणवत्तेचे ब्लॉग लिहिण्यालाच मी आता प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. माझ्या मराठी ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर निदान एवढे तरी आत्मचिंतन करणे मला गरजेचे वाटते.
22 एप्रिल 2010