Saturday, 29 November 2014

वसंत फुलोरा- एक फोटोब्लॉग


उन्हाळा पुण्यामधे आता चांगला स्थिरावतो आहे. गेले काही दिवस त्याचे तळ्यात का मळ्यात चालू होते. एखादा दिवस तपमापकाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोचतो न पोचतो तो पुढचे दोन दिवस तो पस्तिशीतच रेंगाळत राही. एकदा संध्याकाळ झाली की पश्चिमेकडून थंडगार वारे सुटत व दिवसाचा रखरखीतपणा पळून जाई. पण आता हवा बदलणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
मी रोज सकाळी फिरायला जातो. काल सकाळी फिरायला जात असताना सहज आकाशाकडे नजर गेली. गेले काही दिवस निष्पर्ण वृक्ष आणि फांद्याना लटकणारी केविलवाणी पाने बघायची नजरेला सवय झाली होती. काल एखादी जादूची कांडी फिरावी तशा परवापरवा पर्यंत निष्पर्ण दिसणार्‍या फांद्या फुलांनी नुसत्या डवरल्या होत्या. आज सकाळी फिरायला निघालो तो कॅमेरा घेऊनच.

मधुमालती (Rangoon Creeper)
बहावा( Indian Labernum )
झाकरंडा ( Jacaranda )

पांढरा चाफा (Frangipani)
लाल चाफा(Frangipani)
बोगनवेल ( Bougainvillea)
4 एप्रिल 2010