बंगलुरू महानगर, उद्यानांचे शहर म्हणूनच ओळखले जाते. या शहरात असलेली दोन प्रमुख उद्याने, कब्बन पार्क व लालबाग ही अतिशय प्रसिद्ध आहेत. विस्तीर्ण आवार, निरनिराळ्या प्रकारची भरपूर झाडे, फुलझाडे
अतिशय नीटनेटका आराखडा यामुळे बंगलुरूला प्रवासीभेट देणार्या सर्वांच्या
मनात एकदा तरी या उद्यानांना भेट देण्याचा प्लॅन ठरलेलाच असतो. स्थानिक लोकांच्यात सुद्धा, सकाळ संध्याकाळ जॉगिंग करणारी मंडळी, पक्षी निरिक्षक, व्यायामपटू व प्रेमी युगुले यांची निदान एक तरी उद्यान भेट त्यांच्या दैनिक कार्यक्रमात ठरलेलीच असते.

200 एकर एवढ्या मोठ्या आवारात पसरलेले लालबाग उद्यान अडीचशे वर्षे तरी जुने आहे. कब्बन पार्क सुद्धा शंभरहून आधिक वर्षांपूर्वी, तेंव्हाच्या इंग्रज व्यवस्थापनाने, बनवले होते. त्यामुळे या दोन्ही उद्यानात असंख्य जुने व भव्य वृक्ष आहेत. यांच्या घनदाट छायेखाली पिकनिक करणारी अनेक कुटुंबे या उद्यानांत नेहमीच दिसतात. या दोन्ही उद्यानांत जाण्यासाठी कोणतेही प्रवेशमूल्य आकारण्यात येत नाही. त्यामुळे खर्या अर्थाने ती सार्वजनिक उद्याने आहेत असे म्हटले तरी चालेल.

मागच्या वर्षीच्या 26/11 ला मुंबईत झालेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्यांचा एक परिणाम म्हणून हे सगळे बदलणार आहे असे दिसते आहे. मागच्या काही वर्षांत दहशतवाद्यांनी गर्दीने भरलेले बाजार, धार्मिक स्थळे, हॉटेले या साख्या सार्वजनिक जागांना आपले लक्ष बनवले असल्यामुळे या सर्व ठिकाणी उंच उंच काटेरी तारांची कुंपणे व हत्यारधारक सुरक्षा सेवक सगळीकडे दिसू लागले आहेत. मुंबईतल्या मागच्या वर्षाच्या हल्ल्याच्या स्मृती लोकांच्या मनातून अजून पुसल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळेच बंगलुरु उद्यानांच्या व्यवस्थापनांना जास्त काळजीची गरज भासू लागली आहे यात काही नवल नाही. पण यामुळेच या उद्यानांच्या सार्वजनिक स्वरूपाचा आता बळी जाणार असे दिसते आहे.

या उद्यानांच्या व्यवस्थापनाने आता या उद्यानांत प्रवेश करण्यावर बरेच निर्बंध आणण्याचे ठरवले आहे. जॉगर्स, पक्षी निरिक्षक किंवा व्यायामपटू या सारख्या लोकांना ज्यांना पहाटे व सूर्यास्तानंतर या उद्यानांत नियमित प्रवेश हवा असतो त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत व त्या साठी, काही शुल्क भरून, त्यांना अर्ज भरून देण्यास सांगण्यात आले आहे. दिवसातल्या इतर वेळी, ज्यांना प्रवेश हवा असेल, त्यांना तो काही शुल्क भरल्यावरच देण्यात येणार आहे.
बंगलुरुच्या सर्वसाधारण नागरिकांना मात्र उद्यानांचे हे प्रवेश शुल्क आपल्या हक्कांवर आलेले एक संकट वाटते आहे. बंगलुरू जॉगर्स असोसिएशनने या शुल्काला विरोध दाखवला आहे. त्यांच्या मताने ताज्या शुद्ध हवेत श्वासोश्वास करण्यासाठी पैसे भरायला लागावे ही मूलभूत हकांवर आलेली एक गदा आहे. तर काही पर्यावरणवादी गटांना, बंगलुरू शहर एक एलिट व पर्यावरणाची काळजी घेणारे शहर आहे असे दाखवण्याच्या हव्यासापायी सर्वसाधारण गरीब लोकांची या उद्यांनातून हकालपट्टी करण्याचा हा डाव आहे असे वाटते. बंगलुरूची बेघर मुले, वृद्ध, स्थलांतरीत कामगार यांना ही उद्याने म्हणजे एक आधार वाटतो. तसेच लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे कुठेच निवांत जागा न मिळणार्या बंगलुरूच्या प्रेमी युगुलांना ही उद्याने म्हणजे एक सुरक्षित जागा वाटते. या सर्व मंडळींना प्रवेश शुल्क भरणे न परवडणारे असल्याने त्यांना ही एक आपत्तीच वाटते आहे
उद्यान व्यवस्थापनाच्या मताने मात्र हे प्रवेश शुल्क ओळ्खपत्रे देण्यासाठी व सुरक्षा सेवकांचा खर्च भागवण्यापुरतेच असून त्यातून उत्पन्न काहीच मिळणार नसल्याने लोकांच्या तक्रारी अनाठायी आहेत असे वाटते. काही लोकांचे मत, हे प्रवेश शुल्क इतके कमी आहे की यातून हे खर्च सुद्धा भागणार नाहीत असे आहे.

एक गोष्ट मात्र नक्की की बंगलुरूमधल्या सार्वजनिक उद्यानांचे स्वरूप आता सार्वजनिक असे काहीच उरणार नाहीये.
24 डिसेंबर 2009