एकोणिसशे साठच्या दशकात, कॅरी ग्रॅन्ट व ऑड्री हेपबर्न यांच्या प्रमुख भूमिका असलेला शराड (Charade) हा चित्रपट खूप लोकांना आठवत असेल. या चित्रपटामधले पॅरिसचे चित्रीकरण माझ्या मनातून अजुनही पुसले गेलेले नाही. तसेच नंतर याच दशकात आलेला एक बॉलीवूडचा चित्रपट, ‘ऍन इव्हीनिंग इन पॅरिस‘ हा सुद्धा अतिशय लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात पॅरिसमधली संध्याकाळ व रात्र यांचे उत्कृष्ट चित्रीकरण होते. या दोन्ही चित्रपटांनी पॅरिस शहर व विशेषेकरून तिथल्या संध्याकाळी व रात्री, यांच्याबद्दल काहीतरी रंगेल व धुंद अशी छबी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. त्या कालात, परदेश प्रवास हा भारतीयांसाठीतरी दुर्लभच होता असे म्हणले तरी चालेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर पॅरिसला जाण्याची संधी मिळणारा प्रवासी लकी म्हणूनच गणला जाई. साहजिकच
अशी संधी मिळालेला कोणीही पॅरिसला जाणारा प्रवासी मनात काहीतरी अपेक्षा
ठेवूनच जात असे व पॅरिस त्याच्या अपेक्षा बहुतांशी पूर्ण करत असे.

मौला रूज किंवा ल्युडो मधले मन थक्क करणारे नाच, जादूचे प्रयोग, सतत वहात रहाणारी वारुणी व मन उल्हसित करणारे संगीत यांच्या आठवणींनी पॅरिसमधली संध्याकाळ जगभर अजरामजर केलेली आहे. शॉन नदीमधली रात्रीची बोटीतून केलेली सफर, लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात झगमगणारा शॉजे एलिजे हा राजरस्ता व त्याच्यावरचा फेरफटका हे सगळे या अनुभवाचाच भाग आहे. तो प्रवासी आयुष्यात परत पॅरिसला कदाचित जाणारही नाही पण तिथली ती संध्याकाळ तो आयुष्य़भर विसरणारही नाही हे ही खचित.
परंतु पॅरिसची ही रंगेल छबी आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून हे शहर आता निद्रादेवीची युरोपातली राजधानी होत चालले आहे असे इथल्या संगीत व्यावसायिकांना वाटते आहे. ही मंडळी आता इथल्या सांस्कृतिक मंत्री महोदयांकडे एक अर्ज दाखल करणार आहेत. या अर्जावर गायक, डिस्क जॉकीज, संगीतकार व संगीताचे जलसे जिथे भरतात अशा जागांचे मालक या सर्वांच्या सह्या आहेत. आतापर्यंत 9500 लोकांनी या अर्जावर सह्या केल्या आहेत.
पॅरिसच्या, नाइट क्लब्स, डिस्कोज किंवा पब्स असलेल्या अनेक भागांच्यातून आता लोक राहू लागले आहेत. या लोकांना साहजिकच रात्री शांतता हवी असते. त्यामुळे आवाजावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी संगीतचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी बाबेर रस्त्यावर आवाज प्रदुषण झाल्याचे आढळले तर बराच दंड आता करण्यात येऊ लागला आहे. एक असा हॉल La Flèche d’Or. याच्यावर काही दिवसांपूर्वी सहा महिन्यासाठी बंदी घालण्यात आली. La Locomotive, या हॉलचे भवितव्य अनिश्चित आहे तर प्रसिद्ध बीटल्स व रोलिंग स्टो न्स चे कार्यक्रम जेथे होत ते The Pigalle venue आता कर्जात बुडलेले आहे. या सर्व ठिकाणी साउन्ड प्रूफिंग करण्याची गरज भासते आहे व ते फारच खर्चिक असल्याने या हॉल्सना ते करणे शक्य होत नाहीये.
सर्व सार्वजनिक जागी आता धूम्रपान बंदी करण्यात आलेली आहे. यामुळे प्रेक्षक रात्री बाहेर रस्त्यावर येऊन धूम्रपान करतात व आजूबाजूंच्या लोकांना त्याचा त्रास होतो. या गडबडीची जबाबदारी जिथे कार्यक्रम चालू असतो त्या संयोजकांवर टाकण्यात येते व त्यांना दंड होतो. पॅरिसच्या नाइटलाईफची अशी मुस्कटदाबी झाल्याने येथले सर्वोत्कृष्ट कलाकार बाहेर जाऊ लागले आहेत असे या संगीत व्यवसायींना वाटते आहे.
“पॅरिस आता एक मृत शहर झाले आहे.” असे काहीसे अतिरेकी विचार काही मंडळी मांडत असली तरी पॅरीसमधले प्रसिद्ध नाइट क्लब्स अजून पूर्वीसारखीच गर्दी खेचत आहेत असे तिथल्या स्थानिक प्रशासनाला वाटते. हे शहर आता जास्त शांत आणि रहाण्यास जास्त चांगले बनले आहे असेही त्यांना वाटते.
10 नोव्हेंबर 2009