जॉर्ज ऑरवेल या ब्रिटिश लेखकाने 1949मधे, ‘1984’ या नावाची एक जगप्रसिद्ध कादंबरी लिहिली होती. या कादंबरीत, एकाधिकारशाहीमधे खितपत असलेल्या एका समाजाच्या असहाय्यतेचे मोठे भीषण वर्णन आहे. या कादंबरीत केलेल्या वर्णनाप्रमाणे, सर्व
सार्वजनिक व खाजगी जागांच्यात मोठे दूरदर्शन कॅमेरे असे बसवलेले असतात की
कोणत्याही माणसाचे कुठलेही सार्वजनिक किंवा खाजगी वर्तन अधिकार्यांच्या
नजरेतून सुटू नये.
जगभर पसरलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे, सर्वसामान्य माणसावर, आता या कादंबरीत वर्णन केलेल्या दूरदर्शन कॅमेर्यांना सामोरे जाण्याची वेळ, निदान सर्व आंतर्राष्ट्रीय विमानतळांवर तरी येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी एका नायजेरियन नागरिकाने आपल्या कमरेभोवती विस्फोटके बांधून एक अमेरिकन विमान हवेतच उडवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने हा प्रयत्न फसला. परंतु हा नायजेरियन माणूस, कमरेभोवती विस्फोटके बांधलेली असताना सुद्धा विमानतळांवरच्या सर्व सुरक्षा कवचांमधून सुटल्यामुळे, विमानतळांवरच्या सुरक्षा तपासणी प्रणालींच्या कार्यक्षमतेबाबत परत संदेह निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून प्रवाशाच्या संपूर्ण शरीराचे अनावृत्त चित्र दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दर्शवतील अशी यंत्रे(Whole Body Scanners) विमानतळांवर बसवली जाऊ लागली आहेत. नायजेरिया व हॉलंड या दोन देशांनी अशी यंत्रे विमानतळांवर बसवलीही आहेत.

ही यंत्रे कार्य तरी कशी करतात? या यंत्रातील कॅमेर्यासमोर प्रवाशाने दोन्ही हात वर करून एखादे सेकंद उभे रहावयाचे असते. या यंत्रातून अगदी कमी शक्तीच्या एक्स किरणांचे प्रक्षेपण होते. हे किरण अंगावरच्या कपड्यांच्यातून आत शिरतात व शरीराची संपूर्ण अनावृत्त छबी सुरक्षा अधिकार्याच्या समोरच्या टी.व्ही.च्या पडद्यावर दिसू लागते. जर त्या प्रवाशाने काही हत्यारे किंवा विस्फोटके शरीरावर लपवण्याचा प्रयत्न केलेला असला तर पडद्यावर ते लगेच दिसते. या सुरक्षा प्रणालीमुळे दहशतवाद्यांना विमानात चढण्यासाठी प्रतिबंध केला जाईल असा विश्वास सुरक्षा अधिकार्यांना वाटतो आहे.

या यंत्रांबद्दलची सर्वसाधारण प्रवाशांची प्रतिक्रिया साहजिकपणे अतिशय कटू आहे. एक डच महिला याला एक प्रकारचा बलात्कारच मानते आहे. दुसर्या एका प्रवाशाच्या मते हा प्रकार भयानक आहे.

सर्वसाधारणपणे अमेरिकेतील विमानतळांवर ज्या सुरक्षा चाचण्या होतात त्या प्रवाशांच्या मताप्रमाणे आधीच मानहानीहारक व वैयक्तिक स्वातंत्र्याला अनादर दाखवणार्या असतात. म्हातार्या व अधू प्रवाशांना चालायला लावणे, बूट काढून ते उभ्या उभ्याच परत घालावयाला लावणे. वगैरे त्रासदायक प्रकारात आता या नवीन यंत्राची भर पडली तर ते अत्यंत अपमानास्पद होणार आहे. चाऊशेस्क्यू (Ceausescu) च्या राजवटीतले हाल सहन केलेल्या एका रुमानियन माणसाच्या मते या यंत्रासमोर उभे राहणे जास्त अपमानास्पद आहे. धार्मिक बंधने म्हणून बुरखा किंवा ओढणी घेणार्या महिलांना तर या यंत्रासमोर उभे रहाणे हे धर्माविरुद्ध वाटते आहे. अनेक महिला व विशेषकरून तरूण महिला यांना तपासणी करणार्या पोलिस दलातील, विकृत व्यक्तींचीही भिती वाटते आहे.

दहशतवाद्यांमुळे सर्वसाधारण नागरिकांना जे त्रास सहन करावयास लागत आहेत त्यात आणखीनच भर पडणार आहे हे नक्की. परंतु दहशतवादी हल्यात निरपराध नागरिकांचा बळी जाऊन जीवित व स्थावर संपत्तीचा नाश होण्यापेक्षा हे त्रास सहन करणे केंव्हाही चांगले असल्यामुळे आपल्या वैयक्तिक व खाजगी आयुष्यावर आलेल्या या बंधनाला हसत हसत सामोरे जाण्याशिवाय दुसरा तरी काही इलाज मला दिसत नाही.
1 जानेवारी 2010