अलीकडे शाळेत जाणार्या सर्व मुलांच्या गळ्यात किंवा हातात पाण्याची बाटली ही असतेच असते. बाहेरचे
कोणतेतरी अस्वच्छ पाणी आपल्या मुलामुलींनी न पिता घरचे उकळलेले किंवा
फिल्टरमधून काढलेले निर्जंतुक पाणी प्यावे हाच पालकांचा यामागचा उद्देश
असतो आणि तो स्तुत्य आहे यात शंकाच नाही. मी शाळेत असताना आमच्या शाळेत एक पाण्याचा हौद असे. त्याला आठ दहा तोट्या लावलेल्या असत. कॉर्पोरेशनचे पाणी टाकीत पडत असे. ते पाणी तोटीला तोंड लावून प्यावे लागे. आजूबाजूचा भाग नेहमी ओला रहात असल्याने फरशांच्यावर शेवाळे साठे व त्या हिरव्यागार दिसत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पाणी पिण्यामुळे आम्हाला कुठले साथीचे रोग झाल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. पण माझ्या लहानपणीच्या पद्धतीपेक्षा, पाण्याची बाटली नेण्याची आजची प्रथा नक्कीच खूपच जास्त आरोग्यसंवर्धक आहे. या पाण्याच्या बाटल्या असतात तरी किती छान! निरनिराळे मनमोहक रंग, पाणी पिण्यासाठी आतच बसवलेली नळी व चित्र-विचित्र आकार यामुळे या बाटल्या आकर्षक दिसतात. काही बाटल्यांच्यावर मुलांना आवडणारी मिकी, टॉम किंवा डोरा यांची चिकटचित्रे डकवलेली असतात. थोडक्यात म्हणजे मुलांनी या बाटल्यांच्यातलेच पाणी प्यावे हा उद्देश या बाटल्या नक्कीच साध्य करतात.

बाटल्यांसारखाचे लोकप्रिय झालेले दुसरे उत्पादन म्हणजे पेयांचे डबे. हे डबे पत्र्याचे तरी असतात किंवा टेट्रॅपॅक पद्धतीनुसार पुठ्याचे बनवतात. पेय प्यावेसे वाटले की कॅन फोडायचा व कॅनला तोंड लावून सरळ पेय प्यायचे. ग्लास स्वच्छ धुतलेला आहे की नाही? वगैरे शंका-कुशंकांना वावच नाही. असे पेय पिणारी व्यक्ती दिसते सुद्धा आधुनिक.
पण या सर्व आकर्षक डबेबाटल्यांत एक छुपा राक्षस दडलेला आहे असे इंग्लंड व अमेरिकेमधल्या नवीन संशोधनावरून सिद्ध झाले आहे. या राक्षसाचे नाव आहे बिसफेनॉल ए.(bisphenol A) किंवा BPA . या रसायनाचा फवारा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पेयांचे डबे या सगळ्यांच्या आतल्या पृष्ठभागावर करण्यात येतो. या फवार्यामुळे डबा किंवा बाटलीला स्टिफनेस येतो व हाताळणीमधे ते खराब होत नाहीत. अमेरिकन सरकारच्या आरोग्य विभागाने 2006 साली केलेल्या एका पाहणीतून ( US government national nutrition survey in 2006) मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधकांना असे आढळून आले आहे की ज्यांना ह्रदयाचे विकार झालेले आहेत अशा लोकांच्या लघवीत बिसफेनॉल ए. किंवा BPA या रसायनाचे अंश जास्त प्रमाणात सापडतात. इंग्लंडमधल्या एक्सटर येथे असलेल्या Peninsula Medical School मधले epidemiology and public health या विषयाचे प्रोफेसर David Melzer आणि त्यांचे सहकारी यांनी 18 ते 74 या वयोगटातील 1493 व्यक्तींची तपासणी केली व त्यांना बिसफेनॉल ए. या रसायनाचा ह्रदरोगाशिवाय मधुमेह आणि यकृताचे विकार यांच्याशीही संबंध असल्याचे लक्षात आले. डॉक्टर मेल्झर यांच्या संशोधनाप्रमाणे ज्याच्या लघवीत या रसायनाचे अंश मिळतात अशा साठी ओलांडलेल्या एखाद्या पुरुषाला ह्रदयरोग जडण्याची निदान 45% तरी जास्त शक्यता दिसते.

बिसफेनॉल ए. हे रसायन नैसर्गिक रित्या कोठेच मिळत नाही. ते संपूर्णपणे मानवनिर्मित आहे. या रसायनाचे, शरीरातील पुनरुत्पादन संस्थेवर होणारे दुष्परिणाम शास्त्रज्ञांनी पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. परंतु ह्रदय व यकृत यावरील हे दुष्परिणाम नवीनच उघडकीस आले आहेत. कॅनडा मधल्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आदेशाप्रमाणे, हे रसायन विषारी व मानवी आरोग्यास घातक म्हणून घोषित करण्यात आले आहे व लहान बाळांच्या दुधाच्या बाटल्या वगैरे उत्पादनामधे BPA चा वापर आता पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. आज अमेरिकेतील बहुसंख्य लोकांच्या लघवीमधे BPA चा अंश सापडतो. इतकेच काय तर बहुतेक अर्भकांच्या कॉर्ड ब्लडमधेही या रसायनाचे अंश सापडू लागले आहेत. अमेरिकेत हे रसायन बनवणार्या उत्पादकांच्या दबावामुळे तिथल्या आरोग्य विभागाला अजून या रसायनावर बंदी घालता आलेली नाही पण कदाचित 2010 मधे तसे होऊ शकते.

सिंगापूर सारख्या प्रगत देशात, जिथे लोक आरोग्याविषयी जागरूक असतात, BPA चा वापर न केलेल्या प्लास्टिक बाटल्या वगैरे उत्पादने मिळू लागली आहेत. भारतात मात्र ही जागरूकता नसल्याने छोटी मुले किंवा अर्भके जी प्लास्टिक उत्पादने वापरतात त्यात हे रसायन वापरले जाते की नाही याची आपल्या कोणालाच काही माहिती असेल असे वाटत नाही.
13 जानेवारी 2010