तुम्ही
सत्शील आहात. तुमचे चारित्र्य स्वच्छ आहे. कोणताही बाहेरख्यालीपणा, लफडी
तुम्ही करत नाही हे सिद्ध करण्याची एक सोपी परिक्षा आहे. तुमचे डोके आणि
कवटी पुरेशी कडक असली म्हणजे झाले. तुमच्या डोक्यावर एक नारळ फोडून घेतला
की झाले. तुमची ‘तसली’ सर्व पापे आणि गुन्हे माफ. तुम्हाला कदाचित तसे वाटत
नसेलही, पण तामिळ नाडू, कर्नाटक आणि आन्ध्र प्रदेश या राज्यात रहाणार्या
‘कुरुम्ब’ व ’24 मनाई तेलगु चेट्टियार’ या जमातीच्या लोकांचा मात्र यावर
पूर्ण विश्वास आहे.
तामिळनाडूतल्या करूर या जिल्ह्यातील मेट्टुमहादनापुरम या गावात महालक्ष्मीआमन देवीचे मंदिर आहे. या देवळात दर वर्षी आदि नावाचा एक उत्सव साजरा केला जातो. मागच्या शनिवारी म्हणजे 1 ऑगस्टला हा उत्सव साजरा झाला. त्यावेळी तब्बल 750 स्त्री पुरुषांनी आपण सत्शील आहोत किंवा नसलोच तर ती सर्व पापे धुवून जावीत म्हणून आपल्या डोक्यावर या मंदिराचे पुजारी श्री पेरियास्वामी यांच्याकडून नारळ फोडून घेतले.
श्री. पेरियास्वामी गेली 23 वर्षे या दिवशी लोकांच्या डोक्यावर नारळ फोडतात आणि सर्वात विशेष म्हणजे हे नारळ फोडताना त्यांच्या पायात उभे खिळे बसवलेले पादत्राण असते.
सर्व प्रकारची आपत्कालीन रुग्णसेवा, रुग्णवाहिनी व पोलिस बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आले होते. परंतु त्याचा लाभ कोणत्याच भक्तगणानी घेतला नाही. बर्याच लोकांना जखमा झाल्या पण त्यात हळद आणि विभूति भरूनच लोकांनी काम भागवले. नारळ फोडून घेणार्यात पुष्कळ स्त्रिया पण होत्या. फारशी भिती न वाटता त्यांनी नारळ फोडून घेतले. डोक्यावर फोडण्यात येणारे नारळ पूर्ण साफ केलेले असतात व त्यांना हळदीचा लेप दिलेला असतो.
कुरुम्ब जमातीत, बाहेरख्यालीपणा हा बर्याच जास्त प्रमाणात आढळतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्त्री पुरुष संख्येतील असमतोल. या जमातीत स्त्री –पुरुष यांचे प्रमाण 2:1 एवढे जास्त आहे. विशेष म्हणजे एड्सविरोधी प्रचारात या रुढीला सरकारकडून चक्क प्रोत्साहन दिले जात आहे.
आहे ना सोपा मार्ग तुमची सत्शीलता सिद्ध करण्याचा!
7 ऑगस्ट 2009