मागच्या महिन्यात, भारतातल्या राजकारणी मंडळींना एक नवीनच साक्षात्कार
झाला. आपण फार चैनी खुशालीत रहात आहोत व ते लोकांच्या डोळ्यावर येते आहे
असे त्यांना एकदम वाटू लागले. त्यामुळे विमानप्रवास करताना, प्रथमवर्गाऐवजी
ते गुरेढोरे वर्गातून प्रवास करू लागले. कोणी राजकारणी तर आगगाडीमधून
प्रवास करते झाले. महात्मा गांधी आपला प्रवास नेहमी तृतीय वर्गातून करत
असत. कै.सरोजिनीबाई नायडू या कॉंग्रेसच्या त्या वेळच्या एक ज्येष्ठ नेत्या.
त्यांनी महात्माजींच्या या तृतीय वर्गातल्या प्रवासाबद्दल म्हटले होते की
महात्माजींना प्रथम वर्गातून नेण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यापेक्षा
कितीतरी जास्त खर्च कॉंग्रेसला त्यांना तृतीय वर्गाने नेण्यासाठी येतो.
सरोजिनीबाईंच्या या विधानाची प्रचिती आजच्या या तरूण नेत्याच्या नुकत्याच
झालेल्या आगगाडी प्रवासात परत आली. यांच्या बरोबर असलेले झ दर्जाचे सुरक्षा
रक्षक वगैरे सगळ्या मंडळींच्या प्रवासासाठी एक संपूर्ण डबा लागला. अर्थात
एकूण किती खर्च आला याला महत्व नसून नेत्यांच्या आगगाडी प्रवासाला महत्व
आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अर्थात काही वरिष्ठ नेत्यांनी यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. काही
मंडळींचा देहविस्तार, विमानाच्या गुरेढोरे वर्गातील खुर्च्यात
मावण्यासारखा नसल्याने त्यांना विमानप्रवास हा प्रथम वर्गानेच करणे आवश्यक
होते. ते या साध्या प्रवासाच्या आदेशातून आपोआपच सुटले. काही नेतेमंडळी,
मंत्रीमंडळात समावेश झाल्यापासून, त्यांच्या दर्जाचे निवासस्थान उपलब्धच
नसल्याने, पंचतारांकित हॉटेल्समधे कसेतरी वास्तव्य करून होती. आपण या
हॉटेल्सचे बिल स्वत: भरत असल्याने कोणाची काही तक्रार असण्याची शक्यता
नसावी असे त्यांचे म्हणणे पडले. परंतु वरिष्ठ पातळीवरच्या लोकांना त्यांचे
हे समर्थन न पटल्यामुळे घाईघाईने त्यांना सरकारी अतिथीनिवासामधे निवासास
जाणे भाग पडले.
भारतात अतिश्रीमंत लोकांची संख्या काही कमी नाही. ही मंडळी कोट्यावधी रुपये सहजपणे खर्च करू शकतात. ही मंडळी सुद्धा, नेतेमंडळींच्या पावलावर पाऊल टाकून, आपला खर्च लोकांच्या डोळ्यात भरणार नाही या पातळीवर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हे लोक आता सणासुदीला नवे सोन्याचे दागिने खरेदी न करता, सोन्याच्या विटा खरेदी करून, जुनेच दागिने वापरणार आहेत. कपडे घेताना किंमत जरी पूर्वीएवढीच असली तरी ते कपडे एवढे महाग किंमतीचे आहेत हे बघणार्याला कळणार नाही याची काळजी घेऊ लागले आहेत. लग्न समारंभ जास्त भपकेदार न करता करावेत असाही सूर निघतो आहे.
या नेते मंडळींची आणि अतिश्रीमंतांची ही ‘साधी रहाणी’ मोहिम कशासाठी चालली आहे? त्यांना यातून काय सिद्ध करावयाचे आहे? असे प्रश्न कोणासही पडतील. गेल्या एक वर्षापासून आलेली आर्थिक मंदी, या वर्षी कमी प्रमाणात पडलेला पाऊस व परिणामी उत्तर हिंदुस्तानात आलेली दुष्काळसदृष्य परिस्थिती, अन्नधान्य व सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे भडकत चाललेले भाव यामुळे सर्वसामान्य शहरी जनता होरपळलेली आहेच. या उलट शेतमालाला मिळणारे भाव व येणारे खर्च यांचे गणित जमत नसतानाच त्यावर पावसाने मारलेली दडी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या हे याचेच द्योतक आहे. अशा परिस्थितीत आपणही साधेपणे राहून परिस्थितीला कसा हातभार लावतो आहोत हे दाखविण्याचा हा एक अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा प्रयत्न आहे असे मला तरी वाटते.
प्रश्न एवढाच आहे की नेतेमंडळींचा हा दिखावा, न समजण्याएवढे भारतातले लोक मूर्ख आहेत का? नेतेमंडळींनी एखादा विमानप्रवास गुरेढोरे वर्गाने केला म्हणजे त्यांची रहाणी साधी झाली असे वाटायला भारतातल्या लोकांचे बौद्धिक वय 3 किंवा 4 वर्षे इतके कमी नक्कीच नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूका किंवा सध्याच्या महाराष्ट्रातील निवडणूका यात जी मंडळी उमेदवार म्हणून उभी होती किंवा आहेत त्यांच्यावर आपली संपत्ती जाहीर करण्याचे बंधन आहे. यातल्या बहुसंख्य उमेदवारांची संपत्ती दहा बारा कोटी रुपयाच्या पुढेच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या लोकांनी या तरूण वयात एवढी संपत्ती गोळा कशी केली हे न समजण्याइतकी भारतातली जनता दुधखुळी आहे कां? दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेल्सचा रोजचा दर पंधरा ते वीस हजार रुपयाच्या आसपास असतो. सहा महिने आपल्या खिशातून हा खर्च जी व्यक्ती करू शकत असेल तिची एकूण आर्थिक सुबत्ता किती असेल? आणि ती कुठून व कशी आली असेल? हे भारतातल्या जनतेला कळू शकत नाही कां? सर्व सामान्य नागरिकाच्या मनात, या नेतेमंडळींच्या बद्दल, आदर असण्याऐवजी चीड व असहाय्यता का आहे?
सर्वसामान्य माणसाचे आपल्याबद्दल काय मत आहे हे ही नेतेमंडळी अतिशय धूर्त असल्याने पूर्णपणे जाणतात यात शंकाच नाही. अति होते आहे असे वाटल्यानेच त्यांनी हा साध्या रहाणीचा ‘शो’ जनतेला दाखवला असावा. पण त्यांचा हा प्रयत्न फक्त ‘फ्लॉप शो’ झाला आहे असे ‘शो’ करून सत्य परिस्थिती दडवता येत नाही हेच खरे आहे.
12 ऑक्टोबर 2009