Friday, 5 September 2014

केंट रिज पार्क – एक फोटोब्लॉग

माझ्या लहानपणी मला ‘टारझन’ची पुस्तके फार आवडत असत. त्याचे ते जंगलामधल्या उंच उंच झाडावरून झोके देत संचार करणे मला एकदम थ्रिल्लिंग वाटत असे. आपल्याला पण असे करता आले पाहिजे असे मला नेहमी वाटे. माझी लहानपणची इच्छा दोन दिवसापूर्वी एकदम पूर्ण झाली. अगदी झोके देत जरी जमले नाही तरी झाडांच्या शेड्यांजवळून चालत, एका झाडापासून दुसर्‍या झाडापर्यंत व तिथून तिसर्‍या झाडापर्यंत असे मी चालू शकलो. सिंगापूरच्या केंट रिज पार्कमधे, आपल्या सगळ्यांच्यातच, जो एक लहान मुलगा किंवा मुलगी दडलेली असते, खास त्यांच्यासाठीच हा कॅनपी वॉक तयार केला आहे.
चला तर मग !

photo1

सुरवातीची चढण तर एकदम सोपी!


photo2

आता पायाना जरा चढण कळायला लागली!


photo3

अरे! बोलता बोलता बरेच वर आलो.


photo4

अरे बापरे! अजून बराच पल्ला गाठायचा आहे.


photo5

हुश्श! वर तर पोचलो. चला आता झाडांच्या शेंड्यांवर.


photo6

ग्रेट! झाडांच्या टोकाना हात पण लावता येतो आहे.


photoblog7

वाट आणखी आणखी वळणाची होते आहे.


photo8

आता तर घनदाट जंगलातच


photo9

पोचलो बुवा जमिनीवर. इथेच बरे वाटते आहे. कसे हे प्राणी सतत झाडांच्या टोकावर कसे रहातात देव जाणे!

21जून 2009