मंगोलिया या देशाची राजधानी असलेल्या उलन बटोर मधील सोन्गिनो खैरखन या
भागातील एका घरात 200 वर्षापूर्वी हयात असलेल्या एका बौद्ध भिख्खूचा, अतिशय उत्तम
रित्या ममीफाय केलेला मृत देह सापडला आहे.
सायबेरियन टाइम्स या वर्तमानपत्रानुसार हा मृत देह बुरयात बुद्धिस्ट लामा
दाशी- डोर्झो-इगिलॉव्ह याचा आहे. या लामाचा जन्म 1852 मधील असून तो 1927 मध्ये
तपोसाधना करताना मरण पावला होता.
उलन बटोर स्थित बुद्धिस्ट विद्यापीठामधे
असलेल्या मंगोलियन इन्स्टि ट्यूट ऑफ बुद्धिस्ट आर्ट या संस्थेचे संस्थापक
आणि प्रोफेसर असलेले गानहुनजिन पुरेवबाटा यांचे मत मात्रे निराळेच आहे. ते म्हणतात
की हे लामा वज्रासनातील कमल स्थितीत बसलेले आहेत. त्यांचा डावा पंजा उघडलेला आहे
आणि उजवा पंजा ते एखादे सूत्र शिकवत असावेत याचा संकेत देतो आहे. लामांच्या या
आसनामुळे हे लामा मृत नसून बौद्ध लामांच्या प्राचीन परपंरेनुसार अतिशय गाढ
समाधिस्त आहेत. या समाधिस्त आसनाला "तुक्दम" समाधी असे म्हटले जाते.
या लामांचा कातड्यात गुंडळलेला आणि शवपेटीत असलेला देह 1955, 1973 आणि 2002
मध्ये बाहेर काढण्यात आलेला होता व मीठ घालून तो परत आत ठेवण्यात आला होता.
पोलिसांच्या मते मात्र हा देह या घरात सापडण्यामागे एक तस्करी आहे. ते
म्हणतात की कोब्ड्स्क भागातील एका गुहेत हा देह होता व तेथून एका व्यक्तीने चोरून
विक्री करण्यासाठी आपल्या घरी आणून ठेवला होता.
गुंतागुंतीच्या या केस मधे मूळ प्रश्न आहे की हे लामा समाधिस्त आहेत की
चिरशांती उपभोगत आहेत?
11 फेब्रुवारी 2015

