सुंदर शहर म्हणून समजले जाते. या शहराच्या डाउनटाउन जवळ असलेला शहराचा एक जुना पण गजबजलेला भाग गेले दोन तीन महिने बघ्यांची गर्दी खेचत आहे. या भागातील एका जुन्या इमारतीकडे लांब अंतरावरून बघितले तर या इमारतीच्या एका बाजूचा छताजवळचा भाग लाल पिवळ्या रंगात रंगविलेला दिसतो. कुतुहुल वाटून तुम्ही या इमारतीच्या जवळ गेलात तरा या लाल पिवळ्या भिंतीवर, घरातले सर्व फर्निचर खिळे मारून पक्के बसवलेले दिसते. हा काय प्रकार आहे असे कोणालाही साहजिकच वाटेल.
या शहरात रहाणारा एक 27 वर्षाचा तरूण चित्रकार ‘टियागो प्रायमो’ व त्याचा 20 वर्षाचा भाऊ गॅब्रिएल या दोघांनी मिळून, जमिनीपासून 33 फूट (10 मीटर) उंचीवर असलेले, हे एक उभे (Vertical) कला प्रदर्शन निर्माण केले आहे. यात एक पलंग, एक हॅमॉक, सोफा, जेवणाचे टेबल, खुर्ची हे सर्व भिंतीला पक्के बसवले आहे. त्यांच्या या अजब घरात एक जुना फोनो व सजावटीसाठी एक फुलझाड व एक चित्रही त्यांनी लावले आहे.
गंमतीची गोष्ट म्हणजे टियागो आणि गॅब्रिएल त्यांच्या या घरात रोज 12 ते 14 तास मे महिन्यापासून घालवत आहेत. त्यांच्या या घरात इकडून तिकडे जाण्यासाठी, रॉक क्लाइंबिंग करणार्या लोकांचे साहित्य व बूट, हे दोघे वापरतात. आणि शरीरधर्मांचे काय? त्यासाठी शेजारीच असलेल्या एका कला दालनातील सोईचा त्यांना वरच्या वरच वापर करता येतो. त्यांच्या या कलाकृतीने जाणार्या येणार्यांची बरीच करमणूक मात्र नक्की होते आहे. 20 ऑगस्ट पर्यंत तरी त्यांचे हे अजब कला दालन चालू राहील असे दिसते.
हे असे कशासाठी केले आहे या प्रश्नाला उत्तर देताना टियागो म्हणतो की त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव मिळेल अशी आडवी (Horizontal) जागाच न मिळाल्याने त्यांनी हे उभे प्रदर्शन निर्माण केले आहे.
असे हे कलाकार आणि अशी ही त्यांची सृजनशीलता!
10 जुलै 2009
Photo API