कारावास किंवा तुरुंगवास हे शब्द जरी उच्चारले तरी प्रत्येक मराठी
माणसाच्या डोळ्यासमोर उभे रहातात स्वातंत्र्यवीर सावरकर व काळे पाणी.
अंदमानच्या सेल्युलर जेल मधली त्यांची ती अंधारमय कोठडी, केलेले कष्ट व
जन्मठेपेची शिक्षा भोगताना त्यांचे झालेले हाल, हे सर्व डोळ्यासमोर उभे
रहाते. आता कारावासांची परिस्थिती त्या मानाने सुधारली असली तरी एकंदरीत
तुरुंगवास हा शब्द सुद्धा आपल्या अंगावर शहारे उमटवतो यात शंकाच नाही.
या पार्श्वभूमीवर, नॉर्वे या देशातल्या ‘बॅस्टोई’(Bastoey) या
बेटावरच्या तुरुंगाची माहिती वाचली आणि फोटो बघितले तेंव्हा प्रथम डोळ्यावर
विश्वासच बसला नाही. हा तुरुंग बनवताना कै. व्ही. शांताराम यांचा ‘दो आंखे
बारह हाथ ’ हा चित्रपट डोळ्यासमोर ठेवला होता की काय? असेही वाटले.
नॉर्वेची राजधानी ऑस्लोपासून 45 किलोमीटर अंतरावर असणार्या या मुक्त
तुरुंगात 115 कैदी आजमितीला आहेत. हे कैदी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल
शिक्षा भोगणारे असून त्यात, खून, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा
झालेले सुद्धा आहेत.
हा तुरुंग म्हणजे एक शेतमळा असल्याने येथील कैद्यांना, शेतावर करावी लागणारी, गाईंची निगा, लाकूडतोड व सेंद्रीय अन्नधान्याची पिके घेणे यासारखी सर्व कामे करावी लागतात. तोडलेल्या लाकडांपासून फर्निचर बनवण्यासाठी येथे एक सुसज्ज वर्कशॉप आहे. त्यात करवती, कुर्हाडी, सॉ मिल सारखी हत्यारे या कैद्यांना हाताळण्याचे शिक्षण देण्यात येते. तसेच हे लाकूड वापरून घरे कशी बांधावीत हे ही शिकवण्यात येते. कैद्यांच्या कामाची वेळ सकाळी 8.15 ते दुपारी 2.30 एवढीच असते. या नंतर हे कैदी, टेनिस खेळणे, घोड्यांवरून जंगलात फिरणे किंवा समुद्र किनार्यावर पोहणे या सारख्या गोष्टी उन्हाळ्यात करू शकतात. थंडीमधे, स्केटिंग, स्की जंपिंग या सारख्या सुविधा त्यांना उपलब्ध असतात. इमारतीच्या आत खेळण्याचे खेळ, सुसज्ज ग्रंथालय या सारख्या सुविधाही आहेत.
संध्याकाळी सर्व कैदी त्यांच्यासाठी असणार्या सुसज्ज घरात परत जातात. प्रत्येक घरात 4 ते 6 कैदी वास्तव्य करतात. टी.व्ही., फोन सारख्या सुविधाही कैद्यांना दिल्या जातात. या तुरुंगाचे जेल सुपरिंटेंडंट मिस्टर बॉर्नर डाल यांच्या मते पारंपारिक पद्धतीचे तुरुंग या गुन्हेगारांच्या शाळा आहेत. या ठिकाणी कैद्यांना हेटाळणीने व तिरस्काराने वागवले जात असल्याने हे कैदी कधी सुधारूच शकत नाहीत. बॅस्टोई तुरुंगात कैद्यांना, परत चांगले नागरिक कसे बनायचे याचे शिक्षण दिले जाते. इतर तुरुंगात असलेले ड्रग्स सारखे असलेले प्रश्न येथे नाहीत. बहुतेक कैदी तीन चतुर्थांश शिक्षा भोगून झाल्यावर चांगल्या वागणूकीबद्दल तुरुंगातून सोडले जातात.
अर्थात या तुरुंगात येण्याआधी सर्व कैद्यांना पारंपारिक तुरुंगातच आपली शिक्षा चालू करावी लागते. नॉर्वेच्या कायद्यांप्रमाणे फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा कोणालाच दिली जात नाही. जास्तीत जास्त 21 वर्षांची शिक्षा दिली जाते. नॉर्वेमधील प्रोग्रेस पार्टीला हे मान्य नसून गंभीर गुन्ह्यांना जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे असे त्यांचे मत आहे. परंतु सर्वसाधारणपणे तुरुंग असेच मुक्त स्वरूपाचे असावेत असेच सर्वसाधारण मत दिसते.
हा तुरुंग कै. व्ही. शांताराम यांच्या कल्पनेतल्या तुरुंगासारखाच असला तरी येथे ताशा बडवणारी खेळातली गाडी व ती ओढणारी संध्या मात्र दिसत नाही. एवढाच काय तो फरक!
20 ऑक्टोबर 2009